डेंग्यूचा ताप म्हणजे का?

आरोग्य

डेंग्यू हा संसर्गजन्य आजार असून तो डासाच्या चावण्यामुळे होतो. एडिस इजिप्टाय या डासांच्या चावण्यामुळे हा आजार होतो. तोच डास जर दुसऱ्या कोणाला चावला तर त्याला देखील डेंग्यू होण्याची शक्यता असते. आता या डासांबाबत विशेष सांगायचे झाले तर डेंग्यूचे डास हे वेगळे असतात. ते पहाटे घरात प्रवेश करतात. शिवाय ते 1 फुटांपेक्षा जास्त वर उडत नाहीत. त्यामुळे असे डास अनेकदा पायांना चावतात. या डासांच्या 5 ते 6 वेळा चावल्यामुळे हा आजार होण्याची शक्यता असते. डेंग्यूचे एकूण 4 प्रकार आहेत. यातील डेंग्यू 2 हा प्रकार अधिक गंभीर आहे कारण या मध्ये तुमच्या प्लेटलेट्स म्हणजेच पांढऱ्या पेशींची संख्या कमी होऊ लागते. झपाट्याने ही संख्या कमी झाली तर एखादा अवयवही निकामी होऊ शकतो. त्यामुळे डेंग्यू 2 हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.

डेंग्यू तापाची लक्षणे

खूप ताप येणे: वातावरण बदलानंतर ताप येणे आणि डेंग्यूचा डास चावल्यानंतर ताप येणे यात फरक असतो. जर तुम्हाला अगदी फणफणून ताप आला असेल तर तो या दिवसात डेंग्यूचा ताप असण्याची शक्यता असते. त्यामुळे ताप हे याचे पहिले लक्षण आहे.

डोळे जळजळणे: डोळ्यांच्या मागे जळजळ आणि डोळे जळजळणे हे डेंग्यूचे दुसरे लक्षण आहे. तुमच्या डोळ्यांमागे खूप जळजळ होऊ लागते. शिवाय तुमचे डोळेही दुखू लागतात.

अंगदुखी: सर्वसाधारण तापामध्ये अंगदुखी ही होते. पण डेंग्यूच्या तापामध्ये तुमचे हात पाय, सांधे देखील दुखू लागतात. डेंग्यूमुळे हे प्रमाण अधिक होते. तुम्हाला काहीच करावेसे वाटत नाही.

कंटाळा येणे: डेंग्यूचा ताप आल्यानंतर तुम्हाला काहीही करण्याचा कंटाळा येऊ लागतो. कशातच लक्ष लागत नाही. अंथरुणातून उठण्याची देखील इच्छा तुम्हाला होत नाही.

उलट्या होणे: तापामध्ये खाल्लेले पचत नाही त्यामुळे उलट्या होतात.तुम्हाला सतत मळमळल्यासारखे आणि उलटी सारखे वाटते. काहींना उलट्यांमधून रक्तस्रावही होतो. जर तुम्हाला रक्तस्राव होऊ लागला म्हणजे तुम्हाला तुमची अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

त्वचेवर लाल चट्टे येणे: डेंग्यूमधील हे आणखी एक लक्षण म्हणजे तुमच्या अंगावर लाल चट्टे उठू लागतात. शिवाय तुमच्या अंगावर लाल पुळ्या येऊ लागतात. जर तुम्हाला तापात तुमच्या अंगावर चट्टे येताना दिसत असतील तर तुम्हाला डेंग्यू असण्याची शक्यता आहे.

डोकेदुखी: अनेकदा डेंग्यूमध्ये अंगदुखीसोबत तुम्हाला डोकेदुखी होते. ही डोकेदुखी असह्य असते. या डोकेदुखीमुळे तुम्हाला फक्त पडून राहावेसे वाटते.

भूक मरणे: इतर तापांप्रमाणेच डेंग्यूमध्येही भूक मरते. तुम्ही अंगदुखी, डोकेदुखीने इतके असह्य असता की, त्यामुळे तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा नसते. तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा होत नाही.त्यामुळे भूक मरणे हा अगदी सर्वसाधारण त्रास या दिवसांमध्ये होतो.

पांढऱ्या पेशींची संख्या कमी होते: डेंग्यूमधील सर्वात मोठी भीती ही तुमच्या पांढऱ्या पेशी कमी होणे हे आहे. या तापामुळे तुमच्या रक्तातील पांढऱ्यापेशी झपाट्याने कमी होऊ लागतात. जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक असते.अगदी लाखोंच्या संख्येने या प्लेटलेट्स कमी होत असतात.

पोट फुगणे: या दिवसात तुम्हाला पोट फुगण्याचा त्रास देखील होतो. मुळात आहारच नीट नसल्यामुळे पोटाशी निगडीत विकारही तुम्हाला या दिवसात होऊ लागतात.

(सोशल मीडियावरुन साभार)