सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी खा

आरोग्य

हे आहेत लसणाचे औषधी गुणधर्म…!

लसणाच्या पाकळ्यांमध्ये अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म आणि विषारी द्रव्ये बाहेर काढणारे अँटीसेप्टिक गुणधर्म असतात.

रक्तदाब: लसूण रक्तदाब कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण ते नायट्रोजन ऑक्साईड आणि H2S या दोन्ही वासोडिलेटिंग एजंट्सच्या उत्पादनास उत्तेजन देते.

पचनक्रिया सुधारते: लसणाची 1 पाकळी रोज खाल्ल्याने गॅस्ट्रिक ज्यूसचे पीएच सुधारते आणि पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. जुन्या लसणाचा अर्क गॅस्ट्रिक म्यूकोसल अस्तर बरे करण्यास मदत करतो.

कोलेस्ट्रॉल कमी करते: एलडीएल कोलेस्टेरॉलचे ऑक्सिडेशन आणि रक्तवाहिन्यांमधील प्लेक रोखून लसूण रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.

किडनी: एलिसिन हे लसणात आढळणारे संयुग आहे. हे किडनीचे संथ कार्य, रक्तदाब आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव दूर करण्यास मदत करते. यात अँटीहायपरटेन्सिव्ह, अँटीऑक्सिडंट आणि नेफ्रोप्रोटेक्टिव्ह प्रभाव आहेत.

नैसर्गिक अँटिबायोटिक: संक्रामणाद्वारे होणाऱ्या रोगांशी लढण्यासाठी लसणाचा वापर खूप काळापासून होत आहे. लसूण नियमितपणे खाल्ल्याने सर्दी, फ्लू, पोटाचे इन्फेक्शन, श्वसन इन्फेक्शन आणि यूटीआय टाळण्यास मदत होते.

प्रतिकारशक्ती वाढवते: अनेक अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की, लसूण जळजळ कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करू शकते.

संशोधनात असे दिसून आले आहे की, जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी जरी खाल्ली तर शरीरातील पचनक्रिया सुधारते, कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. तसेच उच्च रक्तदाब आणि मधुमेह टाळता येतो.

(सोशल मीडियावरुन साभार)