उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती

आरोग्य

आपल्याला आरोग्यासह खाण्यापिण्याची अधिक काळजी घ्यावी लागते.

सतत डिहाड्रेशनची समस्या झाल्याने पाण्याची तहान लागणे, घसा कोरडा पडणे या समस्येला सामोरे जावे लागते. या ऋतूमध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण ज्यूस किंवा इतर अनेक पेय पितो.

उन्हाळ्यात रस्त्यावर किंवा बाजारात आपल्याला ताक, निरा, लिंबू पाणीवाले पाहायला मिळतात. लिंबू पाणी प्यायल्याने आपली तहान जरी जात नसली तरी आपल्या आरोग्याला त्याचे अनेक फायदे होतात.

कडाक्याच्या उन्हापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी लिंबू पाणी चांगले आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात आहे. जे शरीराला ऊर्जा देऊन डिहायड्रेशनची समस्या कमी करण्यास मदत करतात. परंतु, उन्हाळ्यात योग्य वेळी आपण लिंबू पाणी प्यायला हवे, ज्यामुळे आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होणार नाही.

(सोशल मीडियावरून साभार)