महागाईत दिलासा, LPG सिलेंडर झाला स्वस्त…

देश महाराष्ट्र

मुंबई : प्रचंड महिगाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आज (बुधवार) काहीसा दिलासा मिळाला आहे. आता इंडेन गॅसचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 135 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती सिलिंडर सध्या 19 मे रोजी जारी केलेल्या दराने विकले जात आहे.

एलपीजी सिलेंडरचे दर महिन्यांच्या पहिल्या तारखेला बदलले जातात. आजही एलपीजी सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार कमर्शियल सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइलने एलपीजी सिलेंडरच्या दरात ही कपात केली आहे. दिल्लीत कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत सर्वाधिक कपात करण्यात आली आहे. येथे 19 किलोचा एलपीजी सिलिंडर आज 136 रुपयांनी स्वस्त झाला आहे, तर कोलकाता येथे किमती 133 रुपयांनी कमी झाल्या आहेत. याशिवाय, मुंबईत 135.50 रुपयांनी प्रति सिलेंडरची किंमत कमी झाली आहे, तर चेन्नईमध्ये सिलेंडरची किंमत आज 135 रुपयांनी कमी झाली आहे.

दरम्यान, मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात दोनदा वाढ झाली होती. 7 मे रोजी घरगुती सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती आणि 19 मे रोजीही घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. 7 मे रोजी एलपीजीच्या दरात झालेल्या बदलामुळे जिथे घरगुती सिलिंडर 50 रुपयांनी महागला, तर 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर सुमारे 10 रुपयांनी स्वस्त झाला. १९ मे रोजी त्याचे दर आठ रुपयांनी वाढले होते.  1 जून रोजी 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरवर थेट 135 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे.