सर्व शेतकऱ्यांसाठी अतिमहत्वाची सरकारी सूचना; फार्मर नसल्यास ‘या’ योजनांचा लाभ मिळणार नाही

महाराष्ट्र

आपल्या 7/12 वर नाव आहे का

मग ताबडतोब जवळच्या सीएससी केंद्रावर जा आणि तुमचा फार्मर आय.डी.काढून घ्या.ह फक्त एक ओळखपत्र नाही – तर शेतकऱ्यांसाठी शेकडो सरकारी योजनांचे प्रवेशद्वार आहे!

हे कागदपत्रे लागणार

आधारकार्ड (लिंक केलेला मोबाईल नंबर आवश्यक)

7/12 किंवा 8 अ उतारा

आधारकार्डला जोडलेला मोबाईल नंबर (OTP साठी)

फार्मर आय.डी. म्हणजे काय

ज्याप्रमाणे आधारकार्ड एखाद्या व्यक्तीची ओळख आहे, त्याचप्रमाणे शेतकरी असल्याची अधिकृत ओळख म्हणजे फार्मर आय.डी. शेतीसंबंधित सर्व सरकारी लाभ, अनुदाने, विमा व सवलती मिळवण्यासाठी हे आवश्यक आहे.

फार्मर आय.डी. नसल्यास होणारे मोठे तोटे

पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ बंद

नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ बंद

पिक विमा मिळणार नाही

पिक कर्ज मिळणार नाही

कृषी विषयक सर्व योजना बंद

नैसर्गिक आपत्ती, वादळ, अवकाळी पाऊस, फळपिक किंवा शेतीपिक नुकसानीची भरपाई नाही

जमीन खरेदी-विक्रीमध्ये अडथळे

पिकांचे बाजारभाव लाभ घेता येणार नाहीत

शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री बंद

पंचायत, महसूल व इतर विभागांच्या योजनांचा लाभ बंद

कुठे करायचे

तुमच्या गावातील जवळच्या *सीएससी केंद्रावर* तात्काळ संपर्क करा.

उशीर करू नका

फार्मर आय.डी. नसल्यामुळे तुमचे हजारो रुपयांचे अनुदान, विमा व सवलती थांबू शकतात.