१०० रुपयांत मिळणार अकरावीत प्रवेश

महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘हा’ हेल्पलाईन क्रमांक; जाणून घ्या, संपूर्ण माहिती…

संभाजीनगर: राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यात केंद्रीकृत प्रवेश प्रणाली लागू करण्यात आली आहे. ज्यामुळे विद्यार्थी, पालकांचा वेळ, श्रम व पैसा यामध्ये बचत होणार आहे.

ऑनलाईन नोंदणी कालावधी: १९ मे ते २८ मे २०२५

फीस: फक्त ₹१०० (संपूर्ण राज्यासाठी समान)

अर्ज करण्याचे संकेतस्थळ: https://mahafyjcadmissions.in

ऑनलाईन प्रवेशामुळे काय होणार फायदा

सुलभ प्रक्रिया: घरबसल्या, केव्हाही अर्ज करा

पूर्ण पारदर्शकता: मेरिटवर आधारित प्रवेश

वेळ आणि खर्च बचत: कॉलेजमध्ये जाऊन रांगेत उभे राहण्याची आता गरज नाही. प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचणार आहे.

एकाच पोर्टलवर सर्व माहिती: कॉलेज लिस्ट, वेळापत्रक, निकाल सर्व काही

स्वतःचे प्राधान्य ठरवा: विद्यार्थी त्यांच्या पसंतीनुसार किमान १० कॉलेज निवडू शकतात आणि त्यात बदलही करू शकतात.

दस्तऐवज अपलोड: ओरिजिनल दाखले स्कॅन करून सहज अपलोड करा

गुणवत्तेवर आधारित प्रवेश: सर्वांना मिळणार न्याय्य संधी

विभागीय स्तरावर मिळणार मदतीचे केंद्र:

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मदत

अर्जात सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन

आवश्यक कागदपत्रांचे मार्गदर्शन

OTP किंवा पासवर्ड विसरल्यानंतरच्या अडचणी सोडवणे

महत्त्वाचे

प्रवेश प्रक्रिया: शून्य फेरी, ४ सामान्य फेऱ्या, विशेष फेरी

हेल्पलाइन: 8530955564

ईमेल: support@mahafyjcadmissions.in