शिक्रापूर : देशसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करत आणि जवानांना पाठिंबा देण्यासाठी करंदी (ता. शिरूर) येथे बालरंगभूमी परिषदेतर्फे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात गावातील शाळेतील बालकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सकाळी 8 ते 10 या वेळेत ही रॅली ग्रामपंचायत कार्यालयापासून सुरू होऊन गावातून हनुमान मंदिरापर्यंत उत्साही वातावरणात काढण्यात आली. रॅलीदरम्यान “जय जवान – जय हिंद”, “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” अशा देशभक्तिपर घोषवाक्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
शिरूर तालुक्यातील मान्यवरांच्या अनुभवावर ‘शिरूरचे झिरो टू हिरो’ पुस्तक!
बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष दिपाली शेळके, नंदा ढेरे, सरपंच प्रवीण ढोकले उपसरपंच नितिन ढोकले, शिक्रापूर सरपंच कृष्णा सासवडे, किसान करिअर अकॅडमी चे संजय तांबे, भूषण घोलप, युवा सेनेचे वैभव ढोकले, संतोष दरेकर, मोहन घोलप, बाबुराव चौधरी, बंटी ढोकले, बाळासाहेब ढोकले, सोमनाथ कदम, संतोष खेडकर, गणेश मानकर, राजेंद्र दरेकर, बाबासाहेब दरेकर, पोपट नप्ते, अविनाश साकोरे, तसेच गावातील शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमानंतर बालकांना अल्पोपहार देण्यात आला.
करंदीचे सरपंच प्रवीण ढोकले यांनी बालरंग भूमी परिषदेसाठी 11 हजार रुपयाची देणगी दिली, तसेच मुलांना अल्पोपहार उपलब्ध करून दिला. कोल्हापूर मधील कनेरी मठामध्ये कला संस्कार शिबिरामध्ये सहभागी झालेल्या मुलांना पदाधिकारी व ग्रामस्थांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
बालरंगभूमी परिषदेच्या वतीने सांगण्यात आले की, अशा उपक्रमांद्वारे बालकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणे आणि जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हेच उद्दिष्ट आहे. एका अत्यंत पवित्र आणि गर्वाच्या क्षणासाठी – तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आपल्या भारतीय जवानांना सलाम करण्यासाठी. ही केवळ रॅली नाही, ही आहे आपल्या देशप्रेमाची, आपल्या एकतेची आणि आपल्या अभिमानाची अभिव्यक्ती आहे या भावनेने सर्व बालरंगभूमीचे बाल प्रेक्षक सभासद व नागरिक तसेच बालरंगभूमीचे पदाधिकारी जमले होते.
आज ज्या जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्यामुळे आपण इथे मोकळ्या आकाशाखाली, शांततेने उभे आहोत. सीमेवर ते जागती राहिले, म्हणून आपण इथे मुक्त आहोत. त्यांचा त्याग शब्दांत मांडता येणार नाही, पण आपलं समर्थन, आपली एकजूट, आणि आपलं प्रेम – हेच त्यांच्या बलिदानाचं खऱ्या अर्थाने कौतुक ठरेल. भारतीय जवान सीमेवर डोळ्यात तेल टाकून पहारा देत आहेत त्यामुळे आपण सुखाने झोपू शकतो, त्यामुळेच आपण आपली जबाबदारी आहे की आपण देखील आपल्या सामाजिक सर्व का जपला पाहिजे, आपल्या स्वतःच्या कुटुंबाबरोबरच आपल्या जवानांच्या कुटुंबाची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. करंदी गावातील नागरिक म्हणून भाग्यवान आहोत की आज आपणही या राष्ट्रप्रेमात आपला वाटा उचलत आहोत. आजची रॅली हे फक्त प्रदर्शन नाही, तर एक जागृती आहे – एक संदेश आहे की जवान एकटे नाहीत, देशाची जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. दरम्यान, सर्व करंदीकरांचे बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
नाट्यछटेला पुणे जिल्ह्यातून 2100 मुलांनी नोंदवला उस्फुर्तपणे सहभाग!
बालनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात चांगले कलाकार होणार: अभिनेते विजय पटवर्धन
बाल रंगभूमी परिषद,पुणे जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी दिपाली शेळके यांची निवड
शिरूर तालुक्यातून बाल रंगभूमी परीषदेस मोठा प्रतिसाद; पाहा विद्यार्थ्यांची नावे…
शिरूर तालुक्यातून बाल रंगभूमी परीषदेस मोठा प्रतिसाद; पाहा विद्यार्थ्यांची नावे…