मुंबई: शिरगाव-परंद्वादी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार आणि पोक्सो प्रकरणातील 20 वर्षीय विद्यार्थ्याला मुंबई उच्च न्यायालयाने अटी व शर्थींवर जामीन मंजूर केला आहे.
न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या खंडपीठाने आरोपी रुद्रा अरुण वाघाये यास जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले. आरोपी पुण्यातील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती त्यांचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी न्यायालयास दिली.
प्रकरणाची पार्श्वभूमी
मिळालेल्या माहितीनुसार, 18 जून 2024 रोजी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पीडितेवर बलात्कार करून ती गर्भवती राहिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून येरवडा कारागृहात रवानगी केली होती.
बचाव पक्षाचा युक्तिवाद
सुनावणीदरम्यान अॅड. विपुल दुशिंग यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करत सांगितले की, आरोपी आणि पीडित एकाच महाविद