मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी (E-KYC), आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रिस्टॅक (Agristack) नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS […]

अधिक वाचा..

१३ वर्षे कोमात अडकलेल्या हरीश राणा यांना सन्मानपूर्वक मृत्यू

नवी दिल्ली: २०१३ मध्ये झालेल्या एका भीषण अपघातानंतर तब्बल १३ वर्षे कोमामध्ये अडकून पडलेल्या हरीश राणा यांच्या संघर्षाचा अखेर भावनिक शेवट झाला. सर्वोच्च न्यायालयाने ‘पॅसिव्ह युथेनेशिया’ म्हणजेच सन्मानपूर्वक मृत्यूची परवानगी दिल्यानंतर वैद्यकीय प्रक्रियेनुसार त्यांच्यावर सुरू असलेली जीवनरक्षक यंत्रणा हटवण्यात आली. त्यामुळे दीर्घकाळ सुरू असलेली वेदनांची झुंज अखेर संपली. हरीश राणा हे आपल्या आई-वडिलांचे लाडके चिरंजीव […]

अधिक वाचा..

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय: बलात्कार व पोक्सो प्रकरणातील विद्यार्थ्याला अटींसह जामीन

मुंबई: शिरगाव-परंद्वादी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार आणि पोक्सो प्रकरणातील 20 वर्षीय विद्यार्थ्याला मुंबई उच्च न्यायालयाने अटी व शर्थींवर जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या खंडपीठाने आरोपी रुद्रा अरुण वाघाये यास जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले. आरोपी पुण्यातील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती त्यांचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी न्यायालयास दिली. प्रकरणाची […]

अधिक वाचा..

अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली मराठी भाषा साहित्य अकादमी पुरस्कारांमुळे अधिक समृद्ध

मुंबई: साहित्यिक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ मराठी कादंबरीस ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ तसेच बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ काव्यसंग्रहास ‘बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. साहित्य अकादमीच्या पुरस्कारांमुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली मराठी भाषा साहित्यिक, सांस्कृतिकदृष्ट्या अधिक समृद्ध होण्यास मदत होईल. नवीन पिढी […]

अधिक वाचा..

अखेर दिड वर्षानंतर मंगलदास बांदल यांना जामीन मंजुर

शिरुर (तेजस फडके): पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत परस्पर कर्ज काढल्याने बांदल यांच्यासह अनेक जणांवर फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना अटक केली होती. गेल्या दीड वर्षांहुन अधिक काळ मंगलदास बांदल हे तुरुंगात होते. […]

अधिक वाचा..