औरंगाबाद: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या सर्व लाभार्थी भगिनींना आता e-KYC करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
GR पाहण्यासाठी क्लिक करा https://shorturl.at/4MppK
फक्त 2 महिन्यांची मुदत
आजपासून पुढील दोन महिन्यांच्या आत e-KYC पूर्ण करणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
बँक खाते क्रमांक व IFSC कोड
मोबाईल नंबर (आधारला लिंक असलेला)
पासपोर्ट साईज फोटो
e-KYC का महत्वाच
दरमहा मिळणारे 1500 रुपये वेळेवर मिळतील
खोटे लाभार्थी बाद होतील आणि खरी लाभार्थींचं हक्काचं पैसे मिळतील
भविष्यातील इतर शासकीय योजना व अनुदानासाठी उपयुक्त
संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता व सुरक्षितता
e-KYC न केल्यास काय होणार
1500 रुपयांचा लाभ बंद होईल
पात्रता पडताळणी होणार नाही
पुढील कारवाईस लाभार्थी स्वतः जबाबदार राहतील.
मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन
“सर्व भगिनींनी लवकरात लवकर आपली e-KYC पूर्ण करावी. ही प्रक्रिया सोपी, सुलभ असून भविष्यातील योजनांसाठीही उपयुक्त ठरेल.”
e-KYC करण्याची प्रक्रिया
वेबसाईटला भेट द्या → https://ladakibahin.maharashtra.gov.in
Login वर क्लिक करा आणि आधार क्रमांक व मोबाईल नंबर टाका
मोबाईलवर आलेला OTP एंटर करून पडताळणी करा
तुमची माहिती (नाव, पत्ता, बँक तपशील) तपासा
आवश्यक कागदपत्रे Upload करा (आधार, फोटो, बँक पासबुक)
Submit वर क्लिक करा
स्क्रीनवर “e-KYC पूर्ण झाली आहे” असा मेसेज दिसेल.