मुलांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने वेळीच उपाययोजना कराव्यात; विजय वडेट्टीवार 

नागपूर: नवी मुंबईत दोन विद्यार्थ्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटना गंभीर आहेत. यावरून मुलांना किती मानसिक तणाव आहे हे लक्षात येते. वाढती स्पर्धा, अभ्यासक्रमाचे ओझे अशा कारणांनी या आत्महत्या वाढत आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. नवी मुबंईती दोन […]

अधिक वाचा..

जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पत्रकार भवन व शासकीय कार्यालयात इमारतीत पत्रकार कक्ष सुरू करावा

महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र आरामकक्ष व स्वच्छतागृह असावे मुंबई: जिल्ह्यात व तालुक्याचे ठिकाणी कामासाठी येणाऱ्या ग्रामीण पत्रकारांना विश्रांतीसाठी शासकीय कार्यालय इमारतीत पत्रकार कक्ष सुरू करावेत व जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पत्रकार भवन उभारावे अशी मागणी संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या सूचनेनुसार मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई)कोल्हापूरच्या वतीने जिल्हाधिकारी व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील स्थगन प्रस्ताव नाकारणारे सरकार शेतकरी विरोधी; नाना पटोले

नागपूर: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याची मदत अजून मिळालेली नाही आणि आता पुन्हा गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाने स्थगन प्रस्ताव दिला होता पण भाजपा सरकारने चर्चेपासून पळ काढला. केवळ भरपूर मदत दिली आहे असे म्हणून चर्चा टाळणे हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा […]

अधिक वाचा..

नरेंद्र मोदींचे अहंकारी सरकार देशातील लोकशाहीला घातक; नाना पटोले

मुंबई: २०१४ पासून देशातील राजकीय चित्र बदलले असून दबावाचे, दडपशाहीचे राजकारण सुरु झाले आहे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याचा आवाज बंद केला जातो. देशात जुलमी ब्रिटीशांप्रमाणे राज्यकारभार सुरु असून आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र बदलण्याची गरज आहे. मोदींचा अहंकार लोकशाहीला घातक आहे, हे अहंकारी सरकार घालवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे त्यासाठी स्वातंत्र्य चळवळीप्रमाणे जात- धर्म […]

अधिक वाचा..

राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकार हे गम्मत जम्मत सरकार; नाना पटोले 

मुंबई: राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकार हे गम्मत जम्मतचे सरकार आहे. या सरकारमध्ये एक मंत्री सहा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, ३६ जिल्ह्याला १९ पालकमंत्री नियुक्त केले असून १७ जिल्ह्याला अजून पालकमंत्रीच नाहीत. १५ ऑगस्टला ध्वजारोहण कोण करणार यावरून सरकार संभ्रमात आहे. पालकमंत्री नसताना जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाईल असे सरकारने जाहीर केले होते पण […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्यसरकार बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध; छगन भुजबळ

नाशिक: नाशिक जिल्ह्यात उद्योगांचा अधिक विकास करून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी व बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच राज्यसरकार कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी भवन नाशिक येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये पीकविमा मिळणारच; सरकारचा मोठा निर्णय…

संभाजीनगर: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि सकारात्मक पाऊल उचललं असून शेतकऱ्यांना आता कमीत कमी एक हजार रुपये पीक विमा मिळणार असून, विमा कंपनीची रक्कम कमी असल्यास उर्वरित रक्कम राज्य सरकार देणार असल्याची मोठी घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सरकारी कार्यालयात तब्बल ६७ वर्षांपासून सुरु आहे वीजचोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आंधळगाव ग्रामपंचायतीमध्ये तब्बल ६७ वर्षापासून विजचोरी होत आहे. ही ग्रामपंचायत सन १९५६ साली निर्माण झाली होती. परंतु आंधळगाव ग्रामपंचायत कार्यालयाने आजपर्यंत कोणतेही अधिकृत वीज कनेक्शन घेतले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये अनधिकृत वीज पुरवठा सुरु आहे. राज्यातील शहरी अन् ग्रामीण भागात वीज पुरवठा आणि वीज बिल वसुली करण्याचे […]

अधिक वाचा..

विरोधीपक्षाच्या प्रस्तावाची सत्ताधाऱ्यांकडून थट्टा, सरकार जनतेच्या प्रश्नावर गंभीर नाही…

मुंबई: पावसाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षाकडून अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येतो, हा प्रस्ताव राज्यातील जनतेचे प्रश्न मांडणारा असतो पण विरोधी पक्षाच्या या प्रस्तावाची सत्ताधारी पक्षाकडून थट्टा करण्यात आली. भाजपाप्रणित सरकार जनतेच्या प्रश्नांवर गंभीर नाही. महागाई कमी करण्यासाठी या सरकारकडे कोणतेही धोरण नाही. सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. १०-१५ हजार रुपयांच्या पगारात शहरातील कुटुंबाला […]

अधिक वाचा..

आरोग्य सुविधांअभावी मृत्यू हे सरकारला शोभणारे नाही; बाळासाहेब थोरात

मुंबई: इगतपुरीतील एका आदिवासी महिलेला वेळेवर उपचार मिळत नाही, सुविधा मिळत नाही आणि तिचा मृत्यू होतो हे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला शोभणारे नाही, सरकारने या परिस्थितीकडे गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता आहे, असे मत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. इगतपुरी आणि मोखाडा या आदिवासी दुर्गम बहुल भागात केवळ सुविधा नसल्याने दोन गर्भवती महिला दगावल्या. […]

अधिक वाचा..