ऑल इंडिया स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडेरटेकिंग’ यांच्या संकल्पनेतून केला ‘चालक दिन’ साजरा

महाराष्ट्र

मुंबई: ‘ऑल इंडिया स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडेरटेकिंग’ यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी २४ जानेवारी हा दिवस सार्वजनिक परिवहन संस्थेतील अविभाज्य घटक असलेल्या ‘चालक’ या पदाला योग्य सन्मान व कौतुकाची थाप देण्याच्या उद्देशाने ‘चालक दिन’ म्हणून साजरा करून वास्तवतील या नायकांना सन्मानित करण्यात येते.

बेस्ट व्यवस्थापनाद्वारे देखील सदर दिनाचे औचित्य साधून काल शुक्रवार, (दि. २४) जानेवारी २०२५ रोजी मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यालयात ‘बेस्ट’ मधील अपघात विरहित तसेच निष्कलंक सेवा बजावणाऱ्या १० जेष्ठ बसचालकांचा डॉ. अश्विनी जोशी (भा.प्र.से.), अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) व महाव्यवस्थापक, ‘बेस्ट’ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना डॉ. अश्विनी जोशी यांनी बेस्टचा सुरक्षित प्रवासासाठी असलेला लौकिक यापुढेही अधिक उंचावण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमात बेस्टचे अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.