बेस कॅम्प वर फडकवला 115 फूट लांबीचा तिरंगा
शिरुर (अरुणकुमार मोटे): युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूसवर भारतामार्फत इतिहास घडला असून शिरूर येथील गिर्यारोहक साहिल बांदल याने ७६ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत हे शिखर सर केले आहे. गिर्यारोहनासारख्या साहसी क्रीडा प्रकारात फार कमी लोक असताना आपला ठसा उमटवत साहिलने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलिमांजारो पाठोपाठ युरोपातील सर्वोच्च शिखर एलब्रुस सर केले.
एलब्रूस बेस कॅम्प वर भारताचा ११५ फूट लांबीचा तिरंगा फडकवण्याच्या विक्रमही साहिलने केला आहे.साहिलच्या या कामगिरीचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. सदर मोहीम ११ ऑगस्ट रोजी सुरू झाली होती.या मोहिमेदरम्यान साहिलला माऊंट एल्ब्रस येथील लहरी हवामान तसेच हाडे गोठविणारी थंडी वेगाने वाहणारे वारे या सर्व आव्हानांना तोंड देत शिखर सर करावे लागले.मात्र साहिलने या सर्व आव्हानांचा सामना करत इतरांच्या तुलनेत कमी वेळेत शिखर सर केले.
माऊंट एलब्रूस जगातील सात खंडातील सात सर्वोच्च शिखरांपैकी 5व्या क्रमांकाचे शिखर असून याची उंची १८५१० फूट आहे. जॉर्जीया देशाच्या सरहद्दीपासून २o किलोमीटर अंतरावर हे शिखर वसलेले असून पृथ्वीवरील सर्वात उंच असलेल्यापैकी एक निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे.
माऊंट एल्ब्रस हे शिखर सर करण्यासाठी गिर्यारोहण मधील कौशल्ये यांचे प्रशिक्षण घ्यावे लागते.तसेच खडतर शारीरिक श्रम करावे लागतात.त्याचबरोबर मानसिक क्षमतांचाही कस लागतो. यापूर्वी साहिलने दक्षिण आफ्रिका येथील माऊंट कीलीमांजारो या शिखरावर भारताचा सर्वात मोठा तिरंगा फडकविण्याचा विश्व विक्रम प्रस्थापित केला आहे.तसेच वेगवेगळ्या हिमालयीन मोहिमांमध्ये देखील त्याने उठावदार कामगिरी केली आहे.
साहिलचे यश प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ठ असून ३६०एक्सप्लोरर मार्फत त्याने एलब्रूस शिखर सर करून साहसी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अतिशय खडतर वातावरणात व धाडसाने हे शिखर सर करून संपूर्ण महाराष्ट्रापुढे त्याने एक आदर्श प्रस्थापित केला आहे.