पार्किंगमध्ये उभारलेल्या इमारतीची परवानगी रद्द करण्याची मनसेची मागणी

महाराष्ट्र

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील नगरपरिषद हद्दीतील हॉटेल राजभोगची इमारत बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी शिरूर शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

नगरपरिषद हद्दीतील सर्वे नं २, ५, ६,७,८,९ या मिळतीमध्ये काही जागा व्यापारासाठी व काही जागा निवासासाठी बांधकाम परवानगी देण्यात आली होती. सदर इमारत धारकाने नगरपरिषदेने दिलेल्या बांधकाम परवानगीनुसार बांधकाम न केल्याचे निदर्शनास येत आहे व निवासी असलेल्या जागेत व्यवसाय वापर करत आहे, असे असतानाही कारवाईन करता सदर इमारतीस नगरपालिकेकडून अभय देण्यात येत आहे ही गांभीर्याची बाब आहे.

सदर इमारतीच्या पार्कींग अनाधिकृत वापरा परवाना रद्द करण्याची मागणी बाबत मागील महिन्यात कारवाई करण्यात आली. होती परंतु सदर इमारतधारक पार्किंगचा वापर व्यावसायिक कामासाठी करत आहेत. त्यामुळे नगरपरिषदेच्या बांधकाम परवानगीचं उल्लंघन केलेले आहे. त्यामुळे तात्काळ या इमारतीची बांधकाम परवानगी रद्द करावी. अन्यथा याविरुद्ध लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष महिबुब सय्यद, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे मा. शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित शहराध्यक्ष रवी लेंडे यांनी सांगितले आहे