पुण्यात माजी सैनिकांचा एल्गार, अगली बार सैनिक सरकार

महाराष्ट्र

पुणे (संपत कारकूड): महाराष्ट्रातील माजी सैनिक राजकारणात प्रवेश करणार असुन सन २०२४ च्या निवडणुकीत उमेदवार उभे करुन महाराष्ट्रात सैनिक सरकार आणणार असा निर्धार नुकत्याच पुणे येथे घेतलेल्या माजी सैनिक परिषदेमध्ये अनेक सैनिकांनी व्यक्त केली असून यासाठी सैनिकांनो कामाला लागा असे आव्हान महाराष्ट्रातील विविध सैनिक पदाधिकाऱ्यांनी केले आहे. सैनिक परिषदेचे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोळकर हे होते.

महाराष्ट्रातील आजी-माजी सैनिकांचा मेळावा पुणे येथे रविवार दि ९ ऑक्टोबर २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज हॉल घोरपडी रोड येथे घेण्यात आला. यामध्ये तीनशे माजी सैनिक उपस्थित होते. जय जवान; जय किसान, चा नारा देत देशात सच्चे सरकार आणण्यासाठी आपण कंबर कसली पाहिजे. महाराष्ट्रात एकूण अडीच ते पाऊने तीन लाख माजी सैनिक आहेत. परंतु त्यासाठी एकही विधायक नाही, हि मोठी लाजिरवाणी बाब आहे. शिक्षक मतदार संघ आहे, पदवीधर मतदार आहे, तर सैनिक मतदार संघ का नाही…? शासनाने याचा विचार करावा. यावेळी बोलताना लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोळकर म्हणाले कि, “प्रत्येक प्रशासन सेवेमध्ये सैनिकांकडे कुतूहलाने पहिले जाते. आपण सर्वानी एकत्रित झाले पाहजे. यामध्ये मोठी शक्ती उभी राहणार आहे. तसेच जोपर्यंत सर्व संघटना एक होत नाहीत. तोपर्यंत मिशन २०२४ यशस्वी होऊ शकत नाही. हाही विचार केला पाहिजे.”

या परिषदेचे संयोजक व कल्पक मेजर नारायण अंकुशे यांनी सांगतले कि, सैनिकांच्या समस्या कोणीच जाणून घेत नाहीत. १९७२ च्या युद्धातील सैनिक आजही शासनाचे उंबरठे झिजवत आहेत. सद्यस्थितीत सैनिक नेतृत्वाची गरज आहे. महाराष्ट्राला नवी दिशा देण्याची गरज आहे. त्यासाठी या परिषदेचे आयोजन केले आहे. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून माजी सैनिक उपस्थित होते. त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती.

या कार्यक्रमास गुजरातहून निवृत्त कॅप्टन मदन शर्मा (नेव्ही), मेजर नारायण अंकुशे, तुकाराम डफळ, चंदनशिवे, गफर पठाण, चंद्रकांत खरात, चंद्रप्रहार पाटील, दत्तात्रय टोपे, संतोष भोगाडे, शिवाजी पालवे, संपत दिघे, नगरहून ऍड. शिवाजी डमाळे, उस्मानाबादचे उल्हास शिंदे, अनिल सातव, चंद्रकांत शिंदे, संदीप सांगळे तसेच अडीशे आजी-माजी सैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चंदनशिवे यांनी केले.