जनतेच्या रक्षकांकडेच सर्व स्तरातून दुर्लक्ष…

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): नागरिकांच्या कोणत्याही कठीण प्रसंगात तसेच कोठेई कोणती घटना घडल्यास लोकांना आठवण येते तो विभाग म्हणजे पोलीस मात्र 12 महिने 24 तास काम करुन देखील पोलिसांकडेच सर्वांचे दुर्लक्ष असल्याची बाब खेदजनक असल्याचे दिसून येत आहे.

समाजामध्ये अनेक शासकीय विभाग असून त्यामध्ये प्रत्येक घटकातून शिक्षक, डॉक्टर, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांसह आदी घटकांना आठवड्यात दोन दिवस सुट्टी असते इतकेच नव्हे तर त्यांचे कार्यालय सुद्धा आठवड्यात 2 दिवस बंद असते, शिवाय प्रत्येक शासकीय सुट्टीचा उपभोग या विभागांना घेता येत असतो, तर कोठेही काही घटना घडल्यास कोठे चोरी, अपघात, दंगल, वाहतूक कोंडी, हाणामारी, जंगली प्राण्यांचे हल्ले, जयंती, पुण्यतिथी, परीक्षा, आंदोलन, मोर्चा, पूरस्थिती यांसह आदी घटनेला नागरिकांना प्रथम आठवण होते ते म्हणजे पोलिसांची, प्रत्येक घटनेला पोलीस तातडीने हजार देखील झालेले असतात इतकेच नव्हे तर इतर शासकीय विभागांना आठ तास ड्युटी असते.

मात्र पोलिसांना 24 तास ड्युटी असते, प्रत्येक नागरिक सर्व सन उत्सव तसेच घरातील कार्यक्रम, नातेवाईकांचे लग्न, वाढदिवस उत्साहाने साजरे करत असतात परंतु प्रत्येक सन उत्सवाच्या वेळी पोलीस हातात काठी घेऊन भर उन्हाळा, पावसाळा यामध्ये रस्त्याचे कडेला उभे राहून सेवा बजावत असतात, कमी काळ नोकरी करुन देखील शासकीय योजनांचा लाब सर्व शासकीय घटक घेत असताना जास्त काम करुन देखील पोलीस बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही हि शोकांतिका आहे.

प्रत्येक राजकीय व्यक्तींच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात असतात तर प्रत्येक वेळी इतर शासकीय अधिकारी, मंत्री यांना सुरक्षित पोहोचवण्यासाठी पोलिसांना धावपळ करावी लागत असते परंतु पोलिसांसाठी कोणीही धावपळ करत नसतात, त्यामुळे जनतेसह राजकीय नेते, पुढारी, मंत्री यांच्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीसांचे दुखः शासनाला कधी समजणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

पोलिसांना संघटना नाही…

कोणत्याही शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी अनेकदा संप तसेच आंदोलन करत शासनाकडून त्यांच्या मागण्या पूर्ण करुन घेत असतात मात्र सदर घटकांच्या संप काळामध्ये नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते तर पोलिसांचे कधीही कोठे आंदोलन झाल्याचे कोणीही पाहिले नाही कारण पोलिसांना संघटना नाही.

बोनस पासून पोलीस बांधव लांब…

सध्या सर्व स्तरातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांना शासनाकडून एका महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्यात आलेले मात्र पोलिसांना बोनस नाही तसेच पेंशन योजना नाही अशी स्थिती असताना सुद्धा त्यांच्याबाबत आवाज उठवण्यास कोणीही पुढे येत नाही.

सुविधा, योजनांसह हौसेपासून देखील पोलीस अलिप्त…

जीवनात प्रत्येक व्यक्तीला कोणती न कोणती हौस असते त्यामध्ये अनेक जन केस वाढवले, केसांना रंग करणे, केसांचे वेगळे वळण, दाढी वाढवणे, अंगावर गोंधने, रंगीत कपडे वापरणे, गळ्यात सोने घालणे, हातात कडे घालणे, सोशल मिडीया वापर यांसह आदी हौस प्रत्येकजण करत असतात मात्र पोलिसांना कोणतीही हौस करता येत नसून नियमांचे पालनच करावे लागत आहे.