container-fire

Video! नगर-पुणे महामार्गावर धावत्या कंटेनरच्या टायरला आग; टाकीजवळच भडका…

कारेगाव (तेजस फडके): नगर-पुणे महामार्गावर कारेगाव-रांजणगाव शिव हद्दीत LG कंपनी समोर आज (रविवार) सकाळी अकराच्या सुमारास धावत्या कंटेनरच्या (NL 01 AK 5990) टायरने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, कंटेनरच्या डिझेल टाकीजवळ असलेल्या टायरला आग लागल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. या घटनेमुळे महामार्गावरील वाहनचालकांमध्ये […]

अधिक वाचा..

पुण्यात भाजप नगरसेविकेचा संताप अनावर; ठेकेदाराला थेट ‘जिवंत जाळण्याची’ धमकी!

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या चर्चेदरम्यान सत्ताधारी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांनी एका ठेकेदाराला “सुधारणा केली नाही तर विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार”, असे संतापजनक वक्तव्य केले. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध स्मशानभूमींमधील विद्युत दाहिन्या नादुरुस्त असल्याचा मुद्दा मोरे यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित […]

अधिक वाचा..

पुण्यात मुलाकडून आईची निर्घृण हत्या; घरातच दार बंद करून चाकूने हल्ला, विश्रांतवाडीत खळबळ

पुणे : जन्म देऊन आयुष्यभर सांभाळ करणाऱ्या आईचीच मुलाने हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात घडली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर ३० वर्षीय मुलाने घराचे दार आतून बंद करून आईला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर धारदार चाकूने तिच्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विश्रांतवाडीतील […]

अधिक वाचा..

बीडच्या राष्ट्रीय खो-खो खेळाडूची पुण्यात आत्महत्या; पॉक्सो गुन्ह्यानंतर होता फरार

बीड : बीड येथील राष्ट्रीय पातळीवरील खो-खो खेळाडू तुकाराम करांडे याने पुण्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार होता. अटकेची भीती आणि जामिनाबाबत निर्माण झालेल्या तणावातून त्याने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे […]

अधिक वाचा..

‘छात्रों की गुंज’साठी पुण्यात काँग्रेसची जोरदार तयारी; भाजपवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

पुणे: विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ या देशव्यापी अभियानाचा चौथा कार्यक्रम येत्या शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी पुण्यातील SSPM मैदानावर होणार आहे. विशेषतः मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार […]

अधिक वाचा..

अन्न भेसळीविरोधात FDAची धडक कारवाई; पुण्यात ‘चुल मटण’चा परवाना निलंबित

पुणे : अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू केला आहे. अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसाठी सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत लोहेगाव येथील **‘हॉटेल चुल मटण’**चा अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. सुधारणा होईपर्यंत संबंधित हॉटेलने अन्न व्यवसाय करू नये, असे निर्देश FDAने […]

अधिक वाचा..

सुखबीर बादलांवर हल्ला करणारा जसपालसिंग कोण? पुण्यात वकिली, दोन वर्षांपासून गुरुद्वारात सेवा

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नांदेडजवळील मुगट येथील मातासाहिब गुरुद्वारात दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडत असताना हा प्रकार घडला. हल्ल्यानंतर आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले. हल्लेखोराची ओळख जसपालसिंग अशी झाली असून तो पेशाने वकील असल्याची माहिती समोर आली आहे. ६२ […]

अधिक वाचा..

पुण्यात पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेत ५० हजारांची रोकड लंपास; स्वारगेट पोलिसांकडून चोरट्यांचा शोध

पुणे : कामानिमित्त पुण्यात आलेल्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील प्रवाशाच्या खिशातून गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना स्वारगेट परिसरात घडली. पीएमपीएल बसमध्ये चढत असताना ही चोरी झाल्याचा संशय असून, या घटनेमुळे गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे अहमदपूर येथील रहिवासी असून, […]

अधिक वाचा..

पुण्यात भाजपची भव्य तिरंगा रॅली; १५ ते २० हजार दुचाकींचा सहभाग? राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर म्हणाले…

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे शहरात उद्या, मंगळवार (११ ऑगस्ट) रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये तब्बल १५ ते २० हजार दुचाकी सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने दुचाकी रस्त्यावर उतरल्यास शहरातील वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून […]

अधिक वाचा..

नाशिक-पुणे रेल्वेचा मूळ मार्ग बदलू नका; ६० दिवसांत निर्णय द्या! चक्काजाम आंदोलनाने रस्ते दणाणले

नाशिक: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित मूळ मार्ग कोणत्याही परिस्थितीत बदलू नये, या मागणीसाठी क्रांती दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यासह नाशिक परिसरात नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले. चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर, समृद्धी महामार्गावरील गोंदे फाटा तसेच सिन्नर परिसरात या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे तरुणांचा मोठा सहभाग आंदोलनाचे प्रमुख वैशिष्ट्य […]

अधिक वाचा..