मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याच्या मुदतीत वाढ; असे करा घरबसल्या तुमचा आधार अपडेट..

महाराष्ट्र

संभाजीनगर: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्ड धारकांना एक मोठी खूशखबर दिली आहे. तुमचे आधार तपशील मोफत ऑनलाईन अपडेट करण्याची अंतिम मुदत आता १४ जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

मोफत अपडेट कसे कराल

सर्वप्रथम https://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाइटला भेट द्या

आधार नंबर आणि OTP च्या मदतीने लॉगिन करा

“Document Update” किंवा “Update Demographics Data” हा पर्याय निवडा

नवीन पत्ता, नाव, जन्मतारीख असेल तर योग्य कागदपत्रे अपलोड करा

सबमिट करून अपडेटची पुष्टी मिळवा

यामध्ये तुम्ही खालील माहिती बदलू शकता

नाव (Name)

पत्ता (Address)

जन्मतारीख (Date of Birth)

कोणी आधार अपडेट करावे

UIDAI ने विशेषतः अशा आधार धारकांना त्यांचे रेकॉर्ड अपडेट करण्याचे आवाहन केले आहे, ज्यांनी दहा वर्षांपूर्वी आधार कार्ड मिळवले आहे आणि तेव्हापासून आपली कागदपत्रे अपडेट केलेली नाहीत. ज्या व्यक्तींचे नाव, पत्ता किंवा इतर तपशील बदलले आहेत.