घरकूल योजनेत 50 हजार रुपयांची वाढ, प्रत्येक घरावर सौर पॅनल बसवणार

महाराष्ट्र

औरंगाबाद: राज्यातील बेघर असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे! 2024-25 च्या आर्थिक अर्थसंकल्पात घरकूल योजनेच्या अनुदानात तब्बल ₹50,000 ची वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्र घरकूल योजनेमध्ये देशात नंबर 1 राज्य ठरले आहे. आतापर्यंत 44,07,000 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.

सर्वांसाठी घरे लवकरच नवे गृहनिर्माण धोरण जाहीर

राज्य सरकार लवकरच “सर्वांसाठी घरे” या महत्वाकांक्षी उद्दिष्टासाठी नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करणार आहे. या धोरणात खालील योजना समाविष्ट आहेत

प्रधानमंत्री आवास योजना

पीएम जनमन

रमाई, शबरी, आदिम, पारधी आवास

अटल बांधकाम कामगार वसाहत

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास

मोदी आवास व धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना

अनुदानात वाढ आणि सौर ऊर्जा यंत्रणा दुहेरी फायदा

घरकुलांच्या छतांवर सौर ऊर्जा संच बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे वीज बचतही होणार आणि पर्यावरणपूरक उपक्रमालाही चालना मिळणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (टप्पा 2) अंतर्गत, 2024-25 साठी 20 लाख घरांचे उद्दीष्ट असून त्यापैकी 18.38 लाख घरकुलांना मंजुरी मिळाली आहे.

14.71 लाख लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी ₹2,200 कोटी रुपये वितरीत.

PMAY-Urban Updates

प्रधानमंत्री आवास योजना – शहरी 1 अंतर्गत

4,42,748 घरकुलांना मंजुरी

2,08,304 घरकुलांचे बांधकाम पूर्ण

उर्वरित घरकुलांचे काम 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार

शहरी 2.0 अंतर्गत पुढील 5 वर्षांत

5 लाख घरांचे उद्दिष्ट

₹8,100 कोटींचा निधी

हरित तंत्रज्ञान, नविन बांधकाम पद्धती आणि अधिक अनुदान

 

महाराष्ट्रात आता प्रत्येकासाठी स्वतःचं घर होणं आणखी सोपं आणि शाश्वत होत आहे.