मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांच्यावर उल्हासनगर येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्या मध्ये दोषी असलेल्या लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल न करता त्यांना मोकाट सोडून दिल्याने साळवे वर झालेल्या अन्याय विरोधात ते गेल्या ८ दिवसांपासून आझाद मैदान मुंबई येथे धरणा आंदोलन करत आहेत.
परवाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे काही मोठे नेते आझाद मैदानात येऊन साळवे यांना पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला होता परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे हे साळवे यांना भेटण्यासाठी आझाद मैदानावर येऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार होते. परंतु प्रदेश अध्यक्ष आल्या नसल्याने आंदोलन कर्ते नाराज झाले आहेत.
आझाद मैदानावरील आंदोलन कर्त्यांच्या हा आठ दिवसांचे आंदोलन पाहाता महाराष्ट्र शासनातील गृह विभागाचे उप सचिव सौ. यमुना जाधव यांनी आझाद मैदान पोलिसां मार्फत आंदोलन कर्ते नोवेल साळवे यांना मंत्रालयात बोलवून समस्या विषय विचारणा केली व ठाणे पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक पत्र पाठविण्याचे निर्देश दिले परंतु ही कारवाई समाधानकारक नसल्याने साळवे यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे.