गुड न्यूज! मे महिन्यात टॉप 6 सरकारी नोकऱ्यांसाठी जागा निघणार

महाराष्ट्र

संभाजीनगर: नवीन महिन्याची सुरुवात सरकारी नोकरीच्या जबरदस्त संधींनी झाली आहे.

मे २०२५ मध्ये हजारो पदांसाठी विविध सरकारी विभागांमध्ये भरती सुरू आहे.

रेल्वे, लष्कर, पोलीस, बँक, शिक्षक, नर्सिंग अशा क्षेत्रात भरती होणार असून नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

रेल्वे सहाय्यक लोको पायलट भरती २०२5

भारतीय रेल्वेने 9,970 ALP (Assistant Loco Pilot) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदासाठी उमेदवारांची शारीरिक तंदुरुस्ती आणि तांत्रिक ज्ञान महत्त्वाचे आहे.

पात्रता: 10वी उत्तीर्ण + ITI  

पगार: ₹19,900/- पासून (लेव्हल 2)

अंतिम तारीख: 13 मे 2025

अर्ज लिंक: http://www.rrbapply.gov.in

स्टाफ नर्स भरती २०२५ (BTSC Bihar)

नर्सिंग क्षेत्रातील सर्वात मोठी भरती

एकूण 11,389 पदांवर भरती असून ही संधी महिलांसाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.

पात्रता: GNM / B.Sc Nursing

पगार: ₹44,900/- ते ₹1,42,400/-

अंतिम तारीख: 23 मे 2025

अर्ज लिंक: http://btsc.bihar.gov.in

भारतीय सैन्य TGC भरती २०२५ (TGC 141)

इंजिनीअरिंग केलेल्या तरुणांसाठी भारतीय सैन्यात ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी! TGC कोर्सद्वारे थेट अधिकारी पदावर भरती केली जाते.

पात्रता: BE/B.Tech (संबंधित शाखा)

वयमर्यादा: 20 ते 27 वर्षे

पगार: ₹56,100/- पासून (Level 10)

अंतिम तारीख: 29 मे 2025

युनियन बँक ऑफ इंडिया भरती २०२५

बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठित करिअर शोधणाऱ्यांसाठी संधी! एकूण 500 असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती होत आहे.

पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी (Banking/Finance ला प्राधान्य)

परीक्षा + मुलाखत असे टप्पे

अंतिम तारीख: 20 मे 2025

अर्ज लिंक: http://ibpsonline.ibps.in

अलाहाबाद विद्यापीठ सहाय्यक प्राध्यापक भरती २०२५

शिक्षण क्षेत्रातील उमेदवारांसाठी प्रतिष्ठित नोकरीची संधी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी भरती.

एकूण विभाग: 35

पात्रता: Post Graduation + NET / SET / PhD

पगार UGC Norms (रु. 57,700/- पासून)

अंतिम तारीख 2 मे 2025

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) भरती २०२५

AAI मध्ये Junior Executive पदासाठी भरती जाहीर झाली आहे. एव्हिएशन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.

पात्रता: संबंधित शाखेतील इंजिनीअरिंग डिग्री (Gate स्कोअर आवश्यक)

पगार: ₹40,000 ते ₹1,40,000

अंतिम तारीख: 24 मे 2025

अर्ज लिंक: http://www.aai.aero