मुंबई उत्तर पश्चिममध्ये खासदार कला-क्रीडा महोत्सवाचा महासोहळा; २८ नोव्हेंबरपासून ‘सिजन-२’चा धमाका!

महाराष्ट्र

२८ नोव्हेंबर ते ३१ जानेवारीदरम्यान २८ क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा; खासदार रवींद्र वायकर यांचा पुढाकार

मुंबई: तरुणाईतील क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात भव्य ‘खासदार कला-क्रीडा महोत्सव २०२६-२७ (सिजन-२)’चे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट युवा फॉर विकसित भारत’ या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली खासदार रवींद्र दत्ताराम वायकर यांच्या पुढाकाराने हा महोत्सव रंगणार आहे. २८ नोव्हेंबर २०२६ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये कला आणि क्रीडा कौशल्यांचा महासोहळा अनुभवायला मिळणार आहे.

पहिल्या पर्वाच्या यशानंतर दुसऱ्या सिजनची जय्यत तयारी!

महोत्सवाच्या पहिल्या पर्वाला नागरिक, तरुणाई आणि स्थानिक खेळाडूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेकांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. पहिल्या पर्वाच्या यशामुळे यंदाच्या सिजन-२ बाबतही मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, यंदा गतवर्षीपेक्षा अधिक सहभाग आणि प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत