औरंगाबाद: महापालिका निवडणूक मतदानाच्या दिवशी मतदारांनी मतदान केंद्रावर मतदार ओळखपत्र (Voter ID) दाखवून मतदान करता येते. मात्र, जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल, तरीही काळजी करू नका.
राज्य निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या खालील 12 ओळखीच्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा दाखवून तुम्ही मतदान करू शकता
Voter ID नसल्यास हे 12 पुरावे ग्राह्य धरले जातील
पासपोर्ट
आधार कार्ड
वाहन चालविण्याचा परवाना
पॅन कार्ड
केंद्र/राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेने कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्रयुक्त ओळखपत्र
राष्ट्रीयीकृत बँक किंवा टपाल खात्याचे छायाचित्र असलेले पासबुक
सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला छायाचित्रयुक्त दिव्यांग (अपंगत्व) दाखला
मनरेगा (MGNREGA) अंतर्गत छायाचित्र असलेले जॉब कार्ड
निवृत्त कर्मचारी किंवा त्यांच्या विधवा/अवलंबितांचे छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र (पासबुक/प्रमाणपत्र)
लोकसभा, राज्यसभा, विधानसभा किंवा विधान परिषद सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र
स्वातंत्र्यसैनिकाचे छायाचित्रयुक्त ओळखपत्र
केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले छायाचित्रयुक्त आरोग्य विमा कार्ड
महत्वाची सूचना
योग्य ओळख पुरावा सोबत ठेवा आणि तुमचा मतदानाचा हक्क नक्की बजावा
लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करा, देशासाठी जबाबदारी पार पाडा.