जाणून घ्या दहावी, बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर…

महाराष्ट्र

पुणे: राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २० मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे. तर दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे.

मंडळाच्या वेबसाइटवरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांचकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य वेबसाइटवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सॲप किंवा व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे. या वेळापत्रकांबाबत काही सूचना, हरकती पोअसल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसाच्या आत लेखी स्वरुपात पाठवाव्यात. त्यानंतर आलेल्या सूचनांवर विचार केला जाणार नाही असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.