लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलीय. मागील विधानसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली आहे, असं सत्ताधारी नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. मात्र, ही योजना निवडणुकीपुरतीच होती आणि ती लवकरच बंद होईल, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं.

‘लाडकी बहीण योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार आहे, असं ठाम आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं. लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत आलो आहोत, ‘बहिणीला सक्षम करणे, हा आपला संकल्प आहे, असेही ते म्हणाले. अनेक लोकांना वाटायचं की निवडणुकीपुरतंच हे भाऊ पैसे देणार आहेत. पण आपण निवडणुकीनंतर ही योजना सुरू ठेवली. पुढील पाच वर्षे ही योजना सुरू राहणार आहे. योग्य वेळी या निधीमध्ये वाढ होणार हे ही आम्ही सांगतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.