मुंडेंनी कमळ सोडून घड्याळ हाती बांधलं

महाराष्ट्र राजकीय

बीड: बीडच्या राजकारणात मोठा फेरबदल झाला आहे. बीडच्या वडवणीतील राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांनी कमळ सोडून अजित पवारांचं घड्याळ हाती बांधलं आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश पार पडला.

बाबरी मुंडे हे मंत्री पंकजा मुंडे यांचे मानसपुत्र मानले जातात. राजाभाऊ मुंडे-बाबरी मुंडे हे मंत्री पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. बाबरी मुंडे यांचं वडवणी आमि माजलगाव परिसरात वर्चस्व आहे. मुंडे पिता-पुत्रांच्या पक्षप्रवेशामुळे बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.