‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली तरी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी तो भाजपाच्या दावणीला बांधला असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला. नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावर ज्ञानेशकुमार काम करत असून लोकशाही आणि संविधान संपवण्याचे पाप केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. राहुल […]

अधिक वाचा..

पुण्यात भाजप नगरसेविकेचा संताप अनावर; ठेकेदाराला थेट ‘जिवंत जाळण्याची’ धमकी!

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या चर्चेदरम्यान सत्ताधारी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांनी एका ठेकेदाराला “सुधारणा केली नाही तर विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार”, असे संतापजनक वक्तव्य केले. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध स्मशानभूमींमधील विद्युत दाहिन्या नादुरुस्त असल्याचा मुद्दा मोरे यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित […]

अधिक वाचा..

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने मोठी धास्ती घेतली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ‘छात्रों की गुंज’वर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी गेल्या १३ वर्षांत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांसाठी काय केले, हे जाहीर करावे. सरकारने विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले असते तर दिल्लीतील […]

अधिक वाचा..

‘भाजप सरकारच्या काळात प्रत्येक परीक्षेत घोटाळे; तरुणांच्या भविष्याशी खेळ थांबवा’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्याची पुनरावृत्ती भाजपशासित राज्यांतील परीक्षांमध्ये होत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. नीट, टीईटी, तलाठी आणि CBSE पेपरफुटीनंतर आता MPSCकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपरही फुटल्याचे तपासात सिद्ध झाले असून, MPSCने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणावरून सपकाळ यांनी राज्य […]

अधिक वाचा..

‘मोदींनी चहा कुठे विकला?’; संजय राऊतांचा फडणवीसांसह भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चहावाला’ या राजकीय प्रतिमेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी ज्या काळात गुजरातमधील रेल्वे स्थानकावर चहा विकत असल्याचा दावा केला जातो, त्या काळात संबंधित रेल्वे स्थानकच अस्तित्वात नव्हते, असा दावा राऊत यांनी केला. “मोदींनी लहानपणी चहा विकल्याचा […]

अधिक वाचा..

भाजपला मोठा धक्का! मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भाजपमध्ये बंडाची ठिणगी

कल्याण-डोंबिवली : मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पक्षांतर्गत नाराजी उफाळून आल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय दुर्गेश बागुल यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. डोंबिवलीतील जोंधळे […]

अधिक वाचा..

‘छात्रों की गुंज’साठी पुण्यात काँग्रेसची जोरदार तयारी; भाजपवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

पुणे: विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ या देशव्यापी अभियानाचा चौथा कार्यक्रम येत्या शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी पुण्यातील SSPM मैदानावर होणार आहे. विशेषतः मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार […]

अधिक वाचा..

शिंदेसेनेला भाजपाची धास्ती? राऊतांचा फडणवीसांना इशारा; मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाचा गौप्यस्फोट ते सपकाळांची टीका

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेदांपासून विरोधकांच्या सरकारवरील टीकेपर्यंत विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार संजय गायकवाड यांच्या भाजपाबाबतच्या वक्तव्यांची चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचक इशारा दिला आहे. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्यदिनी शिवसेनेला मोठा धक्का; नर्मदाताई वैतींसह शेकडो समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

मिरा-भाईंदर : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मिरा-भाईंदरच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेनेला धक्का देत माजी नगरसेविका नर्मदाताई वैती यांनी शेकडो समर्थक आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यासोबतच शिवसेनेचे शहर संघटक प्रसाद सुर्वे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार नरेंद्र मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ ऑगस्ट रोजी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. नर्मदाताई वैती यांचा मिरा-भाईंदरच्या राजकारणात […]

अधिक वाचा..

‘भोळा राहिलो तर भाजपवाले खाऊन जातील’; गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ!

जळगाव : महायुतीतील तीन पक्षांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला, तरी अधूनमधून नेत्यांच्या वक्तव्यांतून अंतर्गत मतभेद आणि अविश्वास समोर येत असतो. आता मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. “मी भोळा राहिलो तर मला भाजपवाले खाऊन जातील,” असे विधान गुलाबराव पाटील […]

अधिक वाचा..