पुणे: राज्याच्या राजकारणात सध्या कृषीमंत्र्यांच्या सभागृहातील ‘पत्ते’ खेळण्याच्या प्रकरणावरून जोरदार वादंग सुरू आहे.
हिवाळी अधिवेशनादरम्यान कृषीमंत्री सभागृहात महत्त्वाच्या चर्चेदरम्यान पत्ते खेळत असल्याचा आरोप झाल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी तर या प्रकरणावरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला आहे.