गोवा विधानसभेत शिंदे गटाची एन्ट्री? शिवसेना मुख्यमंत्री देणार; गजानन कीर्तिकरांचा मोठा दावा

महाराष्ट्र

मुंबई: Pramod Sawant यांच्या नेतृत्वाखाली सध्या Bharatiya Janata Partyने गोव्यात मजबूत सत्ता प्रस्थापित केली असून राज्यात सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. दरम्यान, गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी फेब्रुवारी 2027 मध्ये निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या निवडणुकांसाठी भाजपसह Indian National Congress, Aam Aadmi Party, Maharashtrawadi Gomantak Party आणि Revolutionary Goans Party हे प्रमुख पक्ष राजकीय मैदानात सक्रिय झाले आहेत. अशातच आता या निवडणुकीत Eknath Shinde यांच्या शिवसेनेचीही एन्ट्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

माजी खासदार व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते Gajanan Kirtikar यांनी गोवा विधानसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य करत शिवसेना पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे गोव्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.कीर्तिकर म्हणाले, “आमची शिवसेना आगामी गोवा विधानसभा निवडणूक लढवणार आहे. आम्ही केवळ निवडणूक लढवणार नाही, तर गोव्याचा पुढचा मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच असेल,” असा ठाम दावा त्यांनी केला. या वक्तव्यामुळे भाजपच्या गोटातही चर्चांना उधाण आले आहे.

यावेळी त्यांनी गोव्यात बाहेरच्या लोकांचे वर्चस्व वाढल्याचा आरोप करत स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये अन्याय होत असल्याचेही सांगितले. Bal Thackeray यांच्या विचारांवर आधारित शिवसेना गोव्यात स्थापन झाली असून तिला एक वर्ष पूर्ण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.दरम्यान, गोव्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप निश्चित झालेला नसल्याचे कीर्तिकर यांनी स्पष्ट केले. याबाबत लवकरच पक्ष नेतृत्व निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.