Mahaganpati

रांजणगाव गणपती मंदिर आवारातील पाणपोई ऐन उन्हाळ्यात बंद; भाविकांची नाराजी…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com)
रांजणगाव गणपती: रांजणगाव येथे असलेल्या अष्टविनायकांपैकी एक असलेल्या महागपणतीच्या दर्शनासाठी येथे दररोज राज्यासह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असताना मंदिर परिसरात भाविकांसाठी सुरू करण्यात आलेल्या पाणपोई बंद असल्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महागणपती मंदिराच्या आवारात एका पाणपोई आहे. भाविकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली होती. मात्र, उद्घाटनानंतर पाणपोई सध्या बंद आहे. त्यामुळे दर्शनासाठी दूरवरून येणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

उन्हामुळे तापमान वाढले असताना मंदिर परिसरात थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. परंतु, पाणपोई सुरू असूनही त्यात पाणी नाही. काही भाविकांनी सांगितले की, मंदिरात दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते. विशेषतः सुट्टीच्या दिवशी आणि सप्ताहांताला भाविकांची संख्या अधिक असते. अशा वेळी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नसल्यास भाविकांना त्रास सहन करावा लागतो.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनीही मंदिराच्या विकासकामांबाबत चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षांपासून मंदिर परिसरातील विकासकामांचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. भाविकांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधा वाढवण्याची आवश्यकता असून मंदिर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

भाविकांसाठी सुरू केलेली पाणपोई प्रत्यक्षात कार्यान्वित करून नियमित पाण्याची व्यवस्था करावी, तसेच मंदिर परिसरातील विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ओंकार देव यांनी सांगितले की, ‘पाणपोई कार्यन्वीत असून, एखाद्या वेळेस बंद राहिली असेल तर चालू करण्यास सांगितले जाईल.’ दरम्यान, स्थानिक नागरिकाने पाणपोई बंद असल्याचे सांगितले.

श्री महागणपती: रांजणगाव गणपती

Video; रांजणगावच्या महागणपती मंदिरात पाच दिवसांत ४.५ लाख भाविकांनी घेतले दर्शन

रांजणगावमध्ये महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी…

रांजणगाव येथे संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपती च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

संकष्टी चतुर्थी निमित्त श्री महागणपतीच्या मंदिरात सामुहिक अथर्वशीर्ष पठण