nitin-thorat

रणसंग्राम महानगरपालिकांचा! भाजपला बहुमत मिळाले असले तरी हे असे का झाले?

महाराष्ट्र

शिरूर (नितीन थोरात): राज्यातील 29 महापालिकांसह मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असताना भाजप सत्ता मिळवताना दिसत आहे. मतदारांनी दिलेला कौल मुंबई – पुणे सह अनेक ठिकाणी भाजप या पक्षाला बहुमत मिळाले असले तरी हे असे का झाले? याचे वैचारिक मंथन करणे आवश्यक वाटते. आपण सर्वांनी पाहिले आहे की, एकूणच देशातील अनेक राज्य असतील किंवा एकूणच केंद्रात स्थापन झालेले एनडीए सरकार जे भाजप पक्षाच्या बळावर उभे राहिलेले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात भाजप पक्षाच्या सोबत सहभागी झालेली महायुती यामध्ये सामील असलेले प्रादेशिक पक्ष. ही परिस्थिती निर्माण होण्यामागे नेमकी कारणे कोणती? याबाबत समाजामध्ये अनेक चर्चा ऐकताना आपण पाहतो यामध्ये स्थलांतरित झालेले नेते कदाचित ईडीच्या चौकशीला जाण्याच्या भीतीने? की सत्तेत सामील होण्याच्या अभिलाषेमुळे? या पक्ष स्थलांतराची नेमकेपणाने मिमांसा करणे तसे कठीणच आहे. पण या घटनेमुळे निश्चितपणे ज्या प्रमाणात विरोधी पक्ष हवा तेवढा बळकट होण्याऐवजी कमकुवत झालेला आपण पाहतो आहोत. भाजप पक्षाची सत्ता नसताना जे दिग्गज नेते सत्तेत पाहत होतो. तेच भाजप पक्षात सामील झाले. यामध्ये राष्ट्रीयपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षालाही अनेक दिग्गज नेत्यांनी राम राम का ठोकला? याच बरोबरीने प्रादेशिक पक्ष असलेल्याही नेत्यांनी तेच करावे?

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

यामुळे फक्त सत्तेतला पक्ष बदलला माणसे मात्र जुनीच असल्याचे दिसते. यातच सरकारने ज्या योजना समाजासाठी आणल्या त्यामुळे नेमका फायदा कोणाचा झाला? सरकारचा? की, जनतेचा? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहतो. ज्या योजनांमुळे आपण समाधानी आहोत अशा लाडक्या बहिणींचा फायदा आपल्यालाच होतो आहे. असे वरवर तरी दिसत आहे. यामुळेच कदाचित भाजप पक्षाला समाधान वाटणे साहजिक आहे. ज्यांनी निवडणुकीत सहभागी होण्यासाठी मागील अनेक दशके वर्षानुवर्ष समाजाशी आपली नाळ जोडली होती ती नियमितपणे अखंडपणे ते समाजाच्या मनात उतरलेले नेतृत्व यांना आपण ज्या पक्षात आपली इतकी वर्षाची मेहनत करत आहोत. त्याकरिता कदाचित आपण आहोत या ठिकाणी अडचणीत तर नाही ना? सत्तेत असलेल्या पक्षाकडून आपल्या भूतकाळातील काही योग्य, अयोग्य प्रकरणात गुंतवले गेलो तर? आपल्यालाही जामीन नसलेल्या तुरुंगात टाकणार तर नाहीत? “वैरी न चिंती ते मनचिंती” अशा विचारांच्या वादळाने अनेकांनी पक्ष स्थलांतराचे निर्णय घेतले असावेत का?

याच सर्व गोष्टींचा विचार करता एकेकाळी याच पक्षाला उमेदवार शोधावे किंबहुना मिळत नव्हते त्या ठिकाणी आर्थिक गोष्टीचे तगडे उमेदवार आणि त्यांची समाजात असलेली कार्यकर्त्यांची फौज आयतीच मिळाल्याने या पक्षाची घोडदौड जोरात सुरू झाली यात नवल ते काय? याच निवडणुकीत एकूणच झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहिलीत तर ही लोकशाही नेमकी मतावर चालते? की पैशावर? आपणच ठरवा आणि विचार करा
मी मतदान करतो?
मी बेजबाबदारपणे मतदान प्रक्रियेत भागच घेणे टाळतो?
मी माझं मत उच्च भावात?