श्री कृष्ण नगर पूल, श्रेयासाठी प्रकाश सुर्वे यांची पांगळी धडपड…

महाराष्ट्र

मुंबई: मला आठवतंय अगदी बरोबर एका वर्षांपूर्वी मी पर्यायी रस्ता उपलब्ध न करून देता अचानक बंद करण्यात आलेला श्री कृष्ण नगर चा पूल यावर लिखाण केले होते, यामुळे स्थानिक रहिवाश्यांचे आर्थिक आणि वेळेचे कसे नुकसान होत आहे यावर लिहले होते. यात स्थानिक नेते भास्कर खुरसंगे यांचे नियोजन कसे चुकले? आहे यावर लिहले होते, मीच नाही तर माझे मित्र लेखक दिग्दर्शकं सचिन दरेकर यांनी तसेच अनेक स्थानिकांनी ही याबाबत लिहले होते. यात या नियोजनाबद्दल सर्व दोष भास्कर खुरसंगे यांना दिला होता.

बघता बघता वर्ष सरले, पहिले दोन महिने काहीही काम सुरू झाल्याचे न दिसल्याने येता जाता आम्ही या पुलाकडे बघून प्रशासनाच्या नावाने तोंडं सुख घेत होतो. नंतर एकदाचे काम सुरू झाल्याचे दिसलें, भास्कर खुरसंगे यांचे दर आठवड्याला पुलाच्या कामाच्या प्रगतीचे मेसेज दीसत होते, आम्हा रहिवाश्याना जरा दिलासा मिळत होता, भास्कर खुरसंगे यांच्या बद्दल राग कमी होत होता, याला कारण होते, सतत आठवड्याला पुलाच्या कामाच्या प्रगतीबद्दल कळत होते, रात्री बेरात्री भास्कर खुरसंगे स्वतः या कामाच्या ठिकाणी हजर असतानाचे कळत होते.

सकाळी उठल्यावर कामावर जाताना या पुलाकडे बघताना आनंद वाटतं असायचा. बघता बघता वर्ष सरले पुलाचे बांधकाम पूर्ण झाले, फक्त दोन बाजूचे रस्ते जोडले कीं वाहतूक सुरू होईल असे वाटत असतानाच श्रेयाचे वाद सुरू झाल्याचे दिसलें, स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे या पूर्ण झालेल्या पुलावर पाहणी करत असतानाचे फोटो असलेले 40 फुटाचे मोठं मोठे बॅनर दिसलें, यावर कश्या पद्धतीने आम्ही हा पूल पूर्ण केला आणि तो आता खुला होणार असा मजकूर दिसला.

आज हे बॅनर पाहिले कीं पहिले हसू आले, पूर्ण झालेल्या पुलावर उभे राहून फोटो काढून तो पूल बनवायला किती मेहनत केली असं खोटं सांगायचं, काय हे आमदार साहेब? अहो आज श्री कृष्ण नगर, शांतीवन, ऋषींवन अशोकवन या विभागातील प्रत्येकाला खरं सत्य माहिताय, आमदार साहेब पूर्ण वर्षभर या कामाच्या ठिकाणी एकदाही तुम्ही फिरकला नाहीत, तुम्ही सुरत गुवाहाटी करण्यात मशगुल होतात, आम्ही भास्कर खुरसंगे यांना रात्र रात्र बांधकाम ठिकाणी उपस्थित राहिलेले पाहिलय, या पुलासाठी लोकांचे बोलणे खाताना पाहिलंय, त्यामुळे दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा अट्टाहास करू नका, आता असे कळलेय कीं उदघाटनासाठी तुमचे नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या तारखा मिळत नसल्याने तुम्ही तो सुरू न करण्यासाठी प्रशासनावर दवाब आणताय, आमदार साहेब हे सर्व आम्ही सर्व स्थानिक रहिवासी पाहत आहोत. कृपया हे थांबवा, कपटाने दुसऱ्याची रेषा कमी करण्यापेक्षा स्वतः ची रेषा वाढवा, आयत्या बिळावर बसू नका.

प्रमोद शिंदे

प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड

मुंबई प्रदेश