…तर 1 जानेवारी 2026 पासून तुमचे पॅन कार्ड बंद होणार? सुरू राहण्यासाठी काय करायच

महाराष्ट्र

मुंबई: आजच्या काळात पॅन कार्ड म्हणजे आर्थिक व्यवहारांचं मुख्य ओळखपत्र बनलं आहे. बँक खाते उघडणं, इनकम टॅक्स रिटर्न भरणं, कर्ज घेणं, गुंतवणूक करणं अशा अनेक ठिकाणी पॅन आवश्यक आहे.

मात्र आता एक मोठा बदल लागू होणार आहे. जर तुमचं आधार आणि पॅन लिंक नसेल, तर तुमचं पॅन कार्ड 1 जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होऊ शकतं.

सीबीडीटीनं अधिसूचना जारी करून 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे.

पॅन लिंक नसेल तर काय होणार

बँक खाते उघडता येणार नाही

डिमॅट खाते उघडता येणार नाही

शेअर मार्केटमध्ये खरेदी-विक्री करता येणार नाही

50,000 रुपयांपेक्षा जास्त FD करता येणार नाही

सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही

बँक किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळणार नाही

घर किंवा वाहन खरेदी करताना समस्या

परकीय चलन व्यवहार थांबतील

टॅक्स रिफंड मिळणार नाही

टीडीएस आणि टीसीएस जास्त दराने कपात होईल

पॅन-आधार लिंक कसं करायच

www.incometax.gov.in या ई-फायलिंग पोर्टलवर जा

डाव्या बाजूला Link Aadhaar पर्याय निवडा

पॅन आणि आधार क्रमांक टाका

Validate क्लिक करा

ओटीपी टाका आणि लिंक पूर्ण होईल

`जर आधीच लिंक असेल तर तसा मेसेज दिसेल.

एसएमएसद्वारे पॅन-आधार लिंक

संदेश टाईप करा: UIDPAN<स्पेस><आधार क्रमांक><स्पेस><PAN>

उदाहरण: UIDPAN 111122223333 AAAPA9999Q

हा एसएमएस 567678 किंवा 56161 वर पाठवा

अंतिम मुदत चुकली तर

जर 31 डिसेंबर 2025 पर्यंत लिंक केलं नाही तर

पॅन निष्क्रिय होईल

पुन्हा सक्रिय करण्यासाठी 1,000 रुपये दंड भरावा लागेल

पॅन सक्रिय होण्यासाठी 7 दिवस ते 1 महिना लागू शकतो.

काय करावं

आजच पॅन आणि आधार लिंक करा

आधारवरील मोबाईल नंबर अपडेट आहे का तपासा

ई-फायलिंग पोर्टलवर स्टेटस पाहा