solapur farmer

गायीचे शेण विकून बांधला कोटीचा ‘गोधन’ बंगला; शेणातून दीड कोटीची कमाई…

महाराष्ट्र

सोलापूरः सांगोला तालुक्यातील इमदेवाडी गावातील एका शेतकऱ्याने शेण विकून तब्बल एक कोटी रुपयांचा बंगला बांधला असून, बंगल्याला ‘गोधन निवास’ असे नाव दिले आहे. प्रकाश नेमाडे असे शेतकऱ्याचे नाव आहे.

प्रकाश नेमाडे यांच्याकडे दीडशेहून अधिक गायी आहेत. म्हातार्‍या गायी मरेपर्यंत सांभाळतात. याचा अर्थ दूध संपले की ते त्यांना सोडत नाहीत. त्यामुळे त्यांना भरपूर शेण मिळते. हे शेण विकून त्यांनी आणखी एक नवीन व्यवसाय सुरू केला. प्रकाश नेमाडे यांच्याकडे केवळ 4 एकर कोरडवाहू जमीन होती. याच जमिनीवर त्यांनी करोडो रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे. शिवाय, गावातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

प्रकाश नेमाडे यांच्याकडे हा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांच्याकडे फक्त 1 गाय होती. या गायीचे दूध ते गावात विकतात. आज त्यांच्याकडे 150 हून अधिक गायी आहेत. दुधासोबत शेण विकण्याचा व्यवसायही त्यांनी सुरू केला आहे. उद्योजक म्हणून त्यांना विविध ठिकाणांहून युवक भेटायला येतात.