Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली पण ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविल्याचे काम सरकारने केलं अशा शब्दात महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर हल्लाबोल केलाय.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हे आज (दि 3) शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार अशोक पवार, सुरेश भोर, शेखर पाचुंदकर, दामु घोडे, अरुणा घोडे, स्वप्निल गायकवाड, राम गावडे, गणेश जामदार आदी उपस्थित होते.

 

डॉ. कोल्हे म्हणाले की, कांदा निर्यातबंदी उठवली असली तरी हा समाधानकारक निर्णय नसुन एका हाताने द्यायचे अन दुस-या हाताने काढुन घ्यायचे असेच काम सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले.

Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे

शिरुर निकृष्ट पोषण आहार प्रकरण; अमोल कोल्हे म्हणाले, नक्की पोषण कोणाचं सुरु आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत