0%
Skip to content
बुधवार, सप्टेंबर 02, 2026
  • शिरुर तालुक्यातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक – तेजस फडके 9766117755 / 9423020103
Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

shirurtaluka.com : shirur taluka news

  • शिरूर तालुका
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खव्वयेगिरी
  • थेट गावातून
  • मुलाखत
  • भविष्य
  • खूप काही+
    • आजचा वाढदिवस
    • आरोग्य
    • इतर
site mode button

2.60 कोटींचा संशयास्पद व्यवहार; विद्यार्थिनीच्या खात्यातून ‘सायबर रॅकेट’चा सुगावा, मनसे आक्रमक

महाराष्ट्र
फेब्रुवारी 27, 2026फेब्रुवारी 27, 2026शिरूर तालुका टीम

डोंबिवली: शहरातील गोग्रासवाडी परिसरात राहणाऱ्या एका एमएस्सी विद्यार्थिनीच्या बँक खात्यात तब्बल 2 कोटी 60 लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःच्या खात्यात एवढी मोठी रक्कम कशी आली, असा सवाल करत विद्यार्थिनीने पोलिसांकडे धाव घेतली; मात्र कारवाईत टाळाटाळ होत असल्याचा आरोप पुढे येत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

निधी तिवारी (नाव बदललेले) ही कल्याणमधील एका नामांकित महाविद्यालयात एमएस्सीचे शिक्षण घेत आहे. तिची मैत्रीण चांदनी सिंह ही RBL Bank मध्ये कार्यरत आहे. बँकेचे टारगेट पूर्ण करण्यासाठी खाते उघडण्याची विनंती करत चांदनीने निधीला विश्वासात घेतले आणि तिची तीन वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडली. खाते उघडण्यासाठी काही रक्कमही दिल्याचे सांगितले जाते.

काही दिवसांनी निधीला धक्का बसला—तिच्या एका खात्यात 2.60 कोटी रुपये आणि दुसऱ्या खात्यात 10 लाख रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती तिला मिळाली. या व्यवहारांबाबत विचारणा केल्यावर समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने तिने स्वतः चौकशी सुरू केली.

‘उत्तराखंड कनेक्शन’ उघड

प्राथमिक माहितीनुसार, उत्तराखंड येथील नागरिकांची फसवणूक करून जमा झालेली रक्कम निधीच्या खात्यात वळवण्यात आली आणि त्यानंतर ती पुढे वापरली गेली. या रॅकेटमध्ये उल्हासनगर येथील एका व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. निधीने ही सर्व माहिती पोलिसांना दिली आहे.

मनसेची उडी, पोलिसांवर सवाल

गेल्या तीन महिन्यांपासून पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत असूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. यानंतर तिने महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली. जाधव यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, “सायबर गुन्ह्यांवर मोठ्या घोषणा होतात; मग इतक्या मोठ्या व्यवहारानंतरही गुन्हा का दाखल होत नाही?” असा सवाल उपस्थित केला.

संशयिताला चौकशीसाठी बोलावूनही कारवाईविना सोडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पोलिसांचे म्हणणे काय?

रामनगर पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी संबंधित तरुणीचा अर्ज प्राप्त झाल्याचे सांगत चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले. मात्र कोट्यवधींचे व्यवहार होऊनही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मनसेच्या हस्तक्षेपानंतर तपासाला गती मिळते का, तसेच विद्यार्थिनी आणि फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Tagged Clues cyber racketMNS aggressiveRs 2.60 crorestudent's accountSuspicious transaction

पोस्टचे नॅव्हिगेशन

अधिवेशनात कर्जमाफीचा गजर; देवेंद्र फडणवीस यांची जून 2026 ची टाइमलाइन
वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न!

संबंधित पोस्ट

राज्यात आठवड्याभरात वाळू धोरण आणणार, आ. प्रविण दरेकरांच्या प्रश्नावर महसूल मंत्र्यांची घोषणा

मार्च 18, 2025मार्च 18, 2025शिरूर तालुका टीम

पीएम किसान योजना! 22 व्या हप्त्यापुर्वी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

जानेवारी 19, 2026शिरूर तालुका टीम

बहिणीच्या डोळ्यांसमोर भावाची पंचगंगेत उडी; रक्षाबंधनाची राखी हातातच

ऑगस्ट 31, 2026ऑगस्ट 31, 2026शिरूर तालुका टीम

अलीकडील पोस्ट

  • शिरुर पोलिसांची तत्परता; हरवलेली वृद्धाची बॅग एका तासात शोधून केली स्वाधीन
  • फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य
  • शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!
  • शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…
  • अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

Popular Categories

  • आरोग्य (2,376)
  • इतर (155)
  • क्राईम (1,716)
  • खव्वयेगिरी (4)
  • थेट गावातून (18)
  • देश (46)
  • भविष्य (370)
  • मनोरंजन (175)
  • महाराष्ट्र (5,494)
  • मुख्य बातम्या (2,225)
  • मुलाखत (23)
  • राजकीय (1,003)
  • शिरूर तालुका (2,895)

आजचा प्रश्न

शिरूर तालुक्यात निवडणूकीदरम्यान पैसा आणि ड्रग्जचा वापर झाला आहे, असे आपणास वाटते काय?

View Results

Loading ...
  • Polls Archive

शिरुरतालुका बद्दल

शिरूर तालका डॉट कॉम बद्दल थोडक्यात... www.shirurtaluka.com या वेबसाईटचे उद्घाटन २०११ रोजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात झाले आहे. राज्यातील पहिली तालुक्याची वेबसाईट असून, शिरूर तालुक्यातील प्रत्येक घडामोड वेबसाईटवर वाचायला मिळते.

FOLLOW US

काही निवडक श्रेणी

  • शिरूर तालुका
  • थेट गावातून
  • क्राईम
  • राजकीय
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • देश
  • मुलाखत

ताज्या घडामोडी

  • शिरुर पोलिसांची तत्परता; हरवलेली वृद्धाची बॅग एका तासात शोधून केली स्वाधीन
  • फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य
  • शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!
  • शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…
  • अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

Like Us On Facebook

Loading...
© 2022 ShirurTaluka.com. All Rights Reserved. | Theme: News Portal by Mystery Themes.
error: Content is protected !!