मुंबईतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तातडीने कार्यान्वित करा; आमदार अस्लम शेख

महाराष्ट्र

नागपूर: निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन एका वर्षाहून अधिक काळ झाला तरी मुंबईतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित न झाल्याने पर्यावरणाची फार मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. शासनस्तरावर बैठक घेऊन प्रकल्पातील अडथळे दूर करुन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केली.

आमदार शेख म्हणाले, २०० एमएलडी पेक्षा जास्त अशुद्ध सांडपाणी सरळ समूद्रात सोडण्यात येतं, त्यामुळे पर्यावरणीय हानी तर होतच आहे, सोबतच नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आलेले आहे. अधिकारी देखील याबातीत दिरंगाई करित आहेत.  विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील अस्लम शेख यांचा मुद्दा पर्यावरणीयदृष्या महत्त्वाचे असल्याचे सांगत शासनाने यांची गंभीरपणे नोंद घेण्याबाबत निर्देशित केले.