अजित पवार यांच्या पत्नीने पैसे देण्याचा हट्ट का धरला?

महाराष्ट्र

पुणे: नेते, मंत्री किंवा पदाधिकारी हे अनेकदा सामाजिक जीवनात वावरत असतांना खरेदी करतांना दिसत नाही. तशी त्यांच्याकडे यंत्रणा कार्यरतच असते. अनेक कार्यकर्ते, नोकर यांच्याकडूनच तशी कामे करुन घेतली जातात. पण, असे काही प्रसंग असतात की तिथे पैसे देण्याची वेळ येते. तेव्हा जवळ असलेल्या जवळच्या व्यक्तिकडून पैसे घेतले जातात. मग कुठे दान धर्म असो, ओवाळणी असो किंवा दक्षिणा द्यायची असो. तसा गणेशोत्सवात अजित दादांनी सोबतच्या व्यक्तिकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ समोर आलाच होता. पण त्यांच्या पत्नीने याबाबत स्वतःच पैसे देण्याचा हट्ट धरल्याचे समोर आले आहे.

अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पुण्यातील यशश्री सखी समूहाच्या दिवाळी वस्तूंच्या प्रदर्शन आणि विक्रीच्या उद्घाटनाला आल्या होत्या. उद्घाटनानंतर सुनेत्रा पवार या प्रदर्शनाची पाहणी करत असताना त्यांना एक पूजेची वस्तू आवडली आणि त्यांनी ती घेतली सुद्धा. यात आरतीचा काचेचा सेट आणि काचेचे दोन दिवे यांचा समावेश होता. त्यांनी त्यांच्यासोबत असणाऱ्यांना ते घ्या असे सांगितले. आणि लगेच त्यांचा स्टॉल होता त्यांना पैसे किती झाले असे विचारले.

पण तिथल्या स्थानिक नगरसेवकांनी आणि स्टॉल वाल्यांनी ताई पैसे नको असं सांगितलं. पण त्यांच्या या विधानाला सुनेत्रा पवार यांनी लगेच नकार दिला. जर तुम्ही पैसे घेतले तरच मी हा सेट खरेदी करेल असा हट्ट धरला. आणि त्यांनी त्या वस्तूची पूर्ण किंमत देऊनच ती वस्तू खरेदी केली. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पैसे देण्याचा हट्ट आणि पैसे देण्यासाठी ठेवलेली अट पाहून चर्चेचा विषय ठरत आहे.