म्हसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निलेश पोपट नरसाळे यांची निवड

राजकीय शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील म्हसे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीत निलेश पोपट नरसाळे यांची एकमताने सरपंचपदी निवड करण्यात आली आहे. विद्यमान सरपंच मंगलताई जयवंत मुसळे यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.

ही निवड प्रक्रिया मंडल अधिकारी राजेंद्र पोटकुले,ग्राम महसुल आधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, तसेच ग्रामसेविका पल्लवी गावडे (रंधवान) यांच्या उपस्थितीत पार पडली. ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सौरभ दादा काळूराम पवार, जालिंदर संताजी मुसळे,प्रियंका जालिंदर खाडे, मंदाताई वेताळ आणि दामिनी हनुमंत मुसळे यांनी एकमुखाने निलेश नरसाळे यांच्या निवडीला पाठिंबा दिला.

या निवडीनंतर गावात आनंदाचे वातावरण पसरले असून टाकळीहाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे,सुभाष पोकळे,अरुणाताई घोडे, मनीषाताई गावडे,शुभांगी पडवळ,भास्कर शेठ उचळे, शंकर पिंगळे ,मोहन चोरे,शिवाजी नरसाळे,बन्सी घोडे,पारभाऊ गावडे, सुरेश चोरे, गोविंद गावडे,सुरेश साबळे, काळूराम शेठ पवार आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी नवनिर्वाचित सरपंचांचे अभिनंदन केले.या कार्यक्रमाचे निवेदन लहू साबळे यांनी केले तर अर्जुन पवार यांनी निवड प्रक्रिया यशस्वी पार पाडल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.नवनिर्वाचित सरपंच निलेश पोपट नरसाळे यांनी ग्रामविकासासाठी सर्व सदस्यांसह एकजुटीने काम करण्याचा संकल्प या वेळी व्यक्त केला.