crime

शिरुर तालुक्यात दरोडा; वृद्ध महिलांना मारहाण करुन १ लाख ६४ हजारांचे दागिने लंपास

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके) आंबळे (ता. शिरुर) येथे दि (६ जुलै) रोजी रात्री १ च्या सुमारास सहा अनोळखी इसमांनी एका घरात घुसून दोन वृद्ध महिलांना मारहाण करत जबरदस्तीने सोन्याचे दागिने व चांदीची जोडवी असा एकूण १ लाख ६४ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास करत दरोडा टाकला आहे.

या प्रकरणी कल्पना प्रताप निंबाळकर (वय ६०, रा. आंबळे, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. दि ६ जुलै रोजी मध्यरात्री १ च्या सुमारास सहा अनोळखी इसम (वय अंदाजे २० ते २५ वर्षे) अंगाने सडपातळ व मराठी भाषिक होते. त्यांनी हातातील दांडक्यांनी त्यांना व त्यांच्या सासऱ्यांच्या बहिणीला रत्नाबाई शितोळे यांना मारहाण केली व त्यानंतर गळ्यातील व कानातील दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले.

चोरट्यांनी कल्पना निंबाळकर यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, कानातले कर्णफुले तसेच रत्नाबाई शितोळे यांची ८० हजार रुपये किमतीची पोत व कर्णफुले आणि ४ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या जोडव्या असा अंदाजे एकुण १ लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत.

एका महिन्यात दुसरा दरोडा…

आंबळे हे शिरुर-चौफुला महामार्गावरील महत्वाचे गाव आहे. आंबळे गावात एक महिन्यात हि दुसरी दरोड्याची घटना असुन ग्रामस्थांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिरुर पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच पहिल्या दरोड्याचा तपास लागलेला नसताना एक महिन्याच्या आत दुसरा दरोडा पडला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह? पोलिसांना मलिदा मिळाला का…?

शिरुर; गंभीर गुन्ह्यातील माजी पंचायत समिती सदस्याला अटक करण्यासाठी शिरुर पोलिसांना सापडेना मुहूर्त…?

शिरुर; अनाथांच्या हाकेला तरुणांची साथ माहेर संस्थेतील विद्यार्थ्यांना कपडे, पुस्तकं आणि भोजन