Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव वेगात असलेला मालवाहू ट्रक क्र. MH 46 BF 0068 माळवाडी येथील माऊली हॉटेल समोर वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने आज (दि 13) रोजी दुपारी 2:30 च्या सुमारास उलटल्याची घटना घडली आहे. या घटनेत ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रक मालाने भरलेला असताना दोन पलटी घेत पुन्हा सरळ झाला. या अपघातात हॉटेल माऊली समोर असलेला दुचाकी चालक थोडक्यात बचावला असुन या दुर्दैवी घटनेत ट्रक व त्यामधे असलेल्या मालाचे संपुर्ण नुकसान झाले आहे.

या घटनेच्या ठिकाणी बाजूलाच उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्परता दाखवत तातडीने रुग्णवाहिकेला संपर्क करत जखमी चालकाला ट्रकमधून बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यास मदत केली. दरम्यान तळेगाव ढमढेरे -न्हावरे या रस्त्यावर दररोज अपघाताचे सत्र सुरुच आहे. या 24 किलोमीटरच्या अंतरामध्ये एकही गतिरोधक नसल्याने, वाहने अतिशय वेगाने चालतात तसेच या रस्त्याला जास्त वळणे असल्याने चालकांना त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात घडण्याचे प्रमाण जास्त आहे. या रस्त्यावर वेग नियंत्रणासाठी ठिकठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी मागणी वाहनचालक तसेच स्थानिक लोकांनी केली आहे.

शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना