सोनसाखळी चोऱ्यांनंतर आता शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या केबलची चोरी

क्राईम शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात सोनसाखळी चोरांनी धुमाकुळ घातलेला असताना चोरटयांनी आण्णापूर येथील घोडनदी पात्रात असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या विदयुत मोटारींच्या महागड्या केबलची चोरी केली आहे. याबाबत शिरुर पोलिस स्टेशनला संजय रामदास कुंरदळे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. 1) फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजल्याच्या सुमारास फिर्यादी संजय कुंरदळे यांनी घोडनदीवरील मोटार चालु केली होती व शेताला पाणी देवुन सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांची घोडनदीवरिल इलेक्ट्रिक मोटार बंद करुन ते घरी गेले असता त्यानंतर (दि २) फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वाजण्याच्या सुमारास त्यांची इलेक्ट्रिक मोटार चालु करण्यासाठी गेले असता त्यांना इलेक्ट्रिक मोटारीच्या स्टार्टच्या खोक्यामध्ये असलेली केबल कट केलेली दिसली.

त्यावेळी त्यांनी इलेक्ट्रिक मोटारीच्या केबलची पहाणी केली असता इलेक्ट्रिक मोटारची असलेली केबल मिळुन आली नाही. त्यानंतर त्यांनी घोडनदीतील इलेक्ट्रिक मोटारची पाहणी केली असता त्यांना त्यांची इलेक्ट्रिक मोटार नदीच्या पाण्यात मिळुन आली. त्यानंतर त्यांना इलेक्ट्रिक मोटारसाठी लावलेली केबल चोरी गेल्याचे लक्षात आले. तसेच त्यांच्या शेजारी असणा-या इतर शेतक-याच्यांही इलेक्ट्रिक मोटारीची केबल चोरी झाल्याचे लक्षात आले.

शेतकरी अनिल किसन कुंरदळे, रंगनाथ चंदर कुंरदळे, पंडीत धोडीबा कुंरदळे यांच्या विदयुत मोटारींच्या महागडया केबलची तसेच भाउसाहेब शिवाजी कुंरदळे यांची त्यांच्या विहिरीवरून २ एच. पी ची सियाराय कंपनीची इलेक्ट्रिक मोटारीसह अंदाजे ५५, ००० रूपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. बेट भागात बिबटयांनी धुमाकूळ घातला असून त्यात चोरट्यांनीही शेतकऱ्यांच्या मोटारी व केबल चोरुन त्यांचा आर्थिक कणा मोडण्याचे काम केले आहे.