Crime

लाखेवाडीत किरकोळ वादातून शेतकऱ्याला मारहाण

शिरूर तालुका

शिक्रापुर (शेरखान शेख) मलठण (ता. शिरुर) येथील लाखेवाडीत शेतात सोडलेल्या पाण्याचा तसेच झाडाला म्हैस बांधल्याबाबत जाब विचारल्याने शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अंकुश गजाबाज चोरमले या इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मलठण येथील लाखेवाडीचे शेतकरी नामदेव मावळे हे त्यांच्या शेतात गेलेले असताना त्यांच्या शेताच्या बांधावर सीताफळाच्या झाडाला म्हैस बांधलेली तसेच शेतात पाणी सोडल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी शेजारील अंकुश चोरमले यांना याबाबत जाब विचारला. त्यामुळे अंकुश याने चिडून नामदेव यांना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली, याबाबत नामदेव ठकुजी मावळे (वय ७४) रा. लाखेवाडी, मलठण ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिरुर पोलिसांनी येथे अंकुश गजाबाज चोरमले रा. लाखेवाडी, मलठण ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धनंजय थेऊरकर हे करत आहे.