शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासुन झपाट्याने औद्योगिकीकरण वाढतं असल्याने जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. या काळ्या सोन्याच्या मोहापाई महसूल खात्याची पुरती बदनामी होत असुन त्यातच आता लाचलुचपत खात्याच्या गळाला महसूल विभागाचे कर्मचारी लागत असल्याने शिरुर तालुक्यात पुन्हा एकदा महसूल विभागाची चर्चा रंगू लागली आहे. शिरुर तालुक्यातील पाबळ तसेच मलठण येथील मंडळ अधिकारी यांच्या अनेक तक्रारी शिरुर येथील तहसील कार्यालयात येत आहेत. त्यामुळे शिरुरचे तहसिलदार यावर आता काय भुमिका घेतात याकडे सर्वसामान्य लोकांचे लक्ष लागले आहे.
शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी मंडल अधिकारी यांच्या विरोधात बेकायदेशीर नोंदी तसेच सातबाऱ्यावर चुकीच्या नोंदी यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय अशा अनेक तक्रारी येत आहेत. कान्हूर मेसाई येथील सामाजिक कार्यकर्ते दादाभाऊ खर्डे यांनी “शिरूर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले कि, त्यांनी स्वतः मंडल अधिकाऱ्यांच्या तक्रारी देऊन सुद्धा तहसील कार्यालयाने त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.
येथील मंडल अधिकारी हे फक्त शिरुर, पाबळ येथील जमीन खरेदी-विक्री व्यावसायिक यांच्या संपर्कात राहतात आणि त्यांची कामे तातडीने करतात. मात्र सर्व सामान्य शेतकऱ्याची मात्र त्यांच्याकडुन पिळवणूक होत असल्याचे असे खर्डे यांनी सांगितले. तसेच शिरुर तालुक्यातुन रात्रीच्या वेळेस मोठया प्रमाणात मुरुम चोरुन तो मुरुम औद्योगिक वसाहतीत कंपन्याना विकुन शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडत असतानाही महसूल खाते गप्प का…? असा सवालही खर्डे यांनी केला आहे.
या गैरप्रकाराकडे जिल्हाधिकारी लक्ष देणार का…?
पुणे जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी यांच्या समोर शिरुर तालुक्यातील महसुल विभागातील कारमाने थांबवण्याचे मोठे आव्हान असुन जिल्हाधिकारी याकडे गांभिर्याने पाहणार का…? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडुन उपस्थित केला जात आहे. शिरुर तालुक्यात सध्या मोठया प्रमाणात अवैध मुरुमचोरी सुरु असुन त्यावर कारवाई कधी होणार…? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
कारेगाव येथील यश इन चौकात हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन असुनही खुले आम चालतोय वेश्या व्यवसाय…?
शिरुर; ट्रक मालक-चालकाने केला आठ लाख रुपयाच्या कांदयाचा अपहार; गुन्हा दाखल
शिरुर तालुक्यात जलजीवन योजनेच्या कामामुळे रस्त्यांची लागली वाट; खोदकामाचा अंदाज न आल्याने पिकअप पलटी