विकास पाटील व निखिल रावडे यांना बहिर्जी नाईक पुरस्कार प्रदान

शिरूर तालुका

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे शोध पथकात कार्यरत असलेले पोलिस नाईक विकास पाटील व पोलीस शिपाई निखिल रावडे यांना नुकताच पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते बहिर्जी नाईक हा पुरस्कार प्रदान करत त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

unique international school
unique international school

शिक्रापूर ता. शिरूर पोलीस स्टेशन मधील गुन्हे शोध पथकात कार्यरत असलेले पोलिस नाईक विकास पाटील व पोलीस शिपाई निखिल रावडे हे परिसरातील सर्व हालचाली व गुन्हेगारांवर लक्ष ठेवून असतात. त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल केली, तर शिक्रापूर परिसरात दुचाकी चोऱ्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असताना दोघांनी या गंभीर गुन्ह्यांतील आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले असता त्याच्याकडून चोरीच्या तब्बल ४५ दुचाक्या हस्तगत करण्यात आलेल्या होत्या तर तब्बल ५० गुन्हे उघड झाले होते. पोलिस नाईक विकास पाटील व पोलीस शिपाई निखिल रावडे यांच्या या कार्याची दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते पोलिस नाईक विकास पाटील व पोलीस शिपाई निखिल रावडे यांना बहिर्जी नाईक हा पुरस्कार देत गौरव करण्यात आला आहे.

या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. मिलिंद मोहिते, मितेश घट्टे यांसह आदी उपस्थित होते, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी पुणे ग्रामीण पोलिस दलाची धुरा हाती घेताच पोलिस दलात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्रक व पुरस्कार देउन कामातील आलेख वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचा नवा पायंडा पाडला असून त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.