अष्टविनायक महामार्गालगत मलठण येथे धोकादायक विहीर

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) मलठण (ता. शिरुर) येथील गायकवाड वस्तीच्या पुलाजवळ अष्टविनायक महामार्गावर अगदी खेटून एक विहीर आहे. गाड्यांचा वेग आणि तिथे थोडेसे वळण असल्याने केव्हाही अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे विहीरीजवळील संरक्षण कठडयाची उंची वाढवण्याची मागणी मलठण ग्रामस्थ व वाहनचालकांनी केली आहे.

तसेच अष्टविनायक महार्गावर कवठे येमाई गावठाणात इस्टिमेट प्रमाणे रस्ता केला नाही असा आरोप माजी सरपंच बबन पोकळे यांनी केला आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम आम्ही कवठे ग्रामस्थ थांबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. गावठाणात रस्त्याची लांबी कमी केल्याने वाहनचालकांना नाहक त्रास होणार आहे कारण भिमाशंकर व पराग हे दोनही ऊस कारखाने सुरु झाल्यावर या रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतुक सुरु असते. रस्त्याची लांबी कमी असल्याने त्याचा फटका आगामी काळात बसणार असल्याने इस्टीमेट प्रमाणे काम करण्याची मागणी कवठेकरांकडून जोर धरू लागली आहे.