Shirur Police Station

शिरुर पोलिस स्टेशनच्या परिसरात गाडीची काच फोडून एक लाख रुपये लंपास…

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पोलिस स्टेशनपासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी वेंदाता हॉस्पिटलसमोरच पार्क केलेल्या चारचाकी गाडीची काच फोडून दुपारी 3:30 च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी स्वप्निल सुभाष थोरात (रा. रामलिंग रोड, शिरुर) या युवकाच्या गाडीतील एक लाख रुपये लंपास केले आहेत.

याबाबत सविस्तर माहीती अशी की (दि. १५) सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० ते ०३.४५ वाजल्याच्या सुमारास शिरुर शहरातील वेदांता हाँस्पिटलच्या समोर स्वप्निल थोरात हा त्याची ह्युडांई वेरना कार नं एम एच 12 यु सी 5520 हि कार पार्क करुन कामानिमित्त गेला होता. थोड्या वेळाने तो परत आल्यानंतर कारच्या डाव्या बाजुची पुढची काच फोडून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गाडीतील 1 लाख रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली असल्याचे थोरात याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असुन पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अभिजीत पवार हे करत आहेत.

गाड्या पार्क करताना मौल्यवान वस्तु सांभाळा…
शिरुर शहरात चोरटयांनी धुमाकुळ घालत मोबाईल शॉपी तसेच नागरीकांनी पार्क केलेल्या गाडयांमधून रोख रक्कम आणि किंमती ऐवज लुटण्याचा सपाटा लावला असुन मलठण, कवठे येमाई येथे चोरटयांनी रात्रीच्या वेळेस ATM फोडण्याचा प्रयत्न केला आहे. टाकळी हाजी येथेही रात्रीच्या वेळी मोठया संख्येने चोरटे फिरताना CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळे नागरीकांनी सतर्क राहणे गरजेचे असुन शिरुर शहरात आपल्या गाडया सुरक्षित ठिकाणी पार्क करणे गरजेचे आहे.