शिक्रापूर (शेरखान शेख): लांडेवस्ती (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आलेली असताना सदर कार्यक्रमात परिसरातील मुख्याध्यापक शिक्षकांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.

लांडेवस्ती (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेत परिसरातील मुख्याध्यापकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी वंदना शिंदे, केंद्रप्रमुख श्रीहरी पावसे, लांडेवस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका रेशमा शेख, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ आढाव, ग्रामपंचायत सदस्या स्वाती लांडे, बाळासाहेब लांडे, रामदास भुजबळ, मोहन भुजबळ, सचिन लांडे, सचिन आढाव, विजया लोंढे, सरस्वती सिनलकर, शोभा सिनलकर, सुरेखा आढाव यांसह आदी उपस्थित होते. यावेळी शाळेतील सर्वेष लांडे, स्वरांजली धायरकर, सिद्धी आढाव यांनी गणेशवंदना सह सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

यावेळी सर्व उपस्थित मुख्याध्यापक शिक्षकांचा शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्मानचिन्ह देत विशेष सन्मानित करण्यात आले. यावेळी लांडेवस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका रेशमा शेख यांनी सर्वांचे आभार मानले.