कासारीच्या विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 6 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक सरोदे यांनी दिली आहे.

SHEKHAR PACHUNDKAR

कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेत बसले होते. एन एम एम एस शिष्यवृत्तीसाठी अपूर्वा संतोष रावळ ही विद्यार्थीनी पात्र ठरली असून या विद्यार्थिनीस प्रत्येक वर्षी 12 हजार प्रमाणे 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर सारथी शिष्यवृत्तीसाठी अंकिता बबन दिघे, सिद्धी सतीश रुके, क्षितिज माणिक कदम, प्रतीक संदिपान लावंड व श्रेयस बबन रुके हे 5 विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

ranjangaon-mutadwar-darshan
ranjangaon-mutadwar-darshan

या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३८ हजार ४०० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढमढेरे, मुख्याध्यापक अशोक सरोदे, ज्येष्ठ अध्यापिका नसीमा काझी, राजाराम साबळे, शिवाजी पाखरे, अरुण भुजबळ, रावसाहेब थोरात, प्रमिला मोहिते यांनी अभिनंदन केले आहे.