मोठी बातमी! ठाकरे गट आणि शिंदे गटात तुफान राडा, पोलिसांकडून लाठीमार

राजकीय
बुलढाणा: ठाकरे गटातील आणि शिंदे गटातील भांडण आता मुद्द्यांवरुन गुद्यांवर पोहोचल्याची खळबळ जनक बातमी बुलडाण्यात घडली आहे.
बुलडाणा एपीएमसीमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात तुफान राडा झाला. एपीएमसीमध्ये सुरु असलेल्या कार्यक्रमावर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी हल्ला केला. याठिकाणी नवनियुक्त कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ सुरु होता. यात ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांनाही मारहाण करण्यात आली.
जिल्हाप्रमुख संजय हाडे यांच्या पोटात लाथ मारण्यात आली असा आरोप करण्यात येतोय. विशेष म्हणजे तगडा पोलीस बंदोबस्त असताना हा हल्ला झाला. हल्ला करणाऱ्यात आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड तसंच त्यांचे सहकारी आघाडीवर होते, असा आरोप ठाकरे गट संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केलाय. जवळपास 15 मिनिटे हा सगळा प्रकार सुरु होता. पोलीस बघ्याची भूमिका घेत होते असा आरोप ठाकरे गटाने केलाय. पोलिसांनी घटना नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला. या घटनेनंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाली.